---Advertisement---

काय सांगता! कोटी रुपये कमावणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये 10000 रुपयांसाठी होते स्पर्धा, ‘हे’ आहे खास कारण

On: रविवार, मार्च 8, 2026 5:45 PM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा आज (८ मार्च) शेवटचा सामना खेळला जाणार आहे. यावरून भारत की न्यूझीलंड विजेतेपद जिंकणार याचा निर्णय होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी भारताबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे भारतीय खेळाडूंमध्ये १०-२० हजारांसाठी चढाओढ होते. हे कशावरून ते जाणून घेऊ.

भारतीय संघाचे क्रिकेटपटू जे कोटी रुपये कमावतात आणि त्यांना प्रत्येक सामना खेळण्यासाठी लाखो रुपये मिळतात. त्यांच्यामध्ये १०००० रुपयांसाठी कसली स्पर्धा होत असेल हे वाचून आश्चर्य वाटत असले, मात्र हे सत्य आहे. भारतीय वरिष्ठ पत्रकार विमल कुमार यांनी भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक यांच्यातील १०००० रुपयांच्या नेमक्या प्रकरणाची माहिती सांगितली आहे.

कुमार यांच्यानुसार, भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप १० ते २० हजार रुपये देत भारतीय खेळाडूंना उत्तम क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देतात. यावरून भारतीय खेळाडूंना दिलीप यांच्याकडून १०००० घेण्याची चढाओढ नाहीतर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. दिलीप हे पैसे एका बंद पाकिटात त्यांच्या पगारातून देतात. या स्पर्धेदरम्यान ईशान किशनला एक पाकिट मिळाले आहे, असे कुमार यांनी सांगितले आहे.

भारताची टी२० विश्वचषक २०२६मधील क्षेत्ररक्षण पाहिले तर खेळाडूंनी निराशा केली आहे. उपांत्य फेरीत मात्र भारताची कामगिरी सुधारली. अक्षर पटेलने उत्तम कामगिरी करत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताचा विजय सोपा केला. तसेच या स्पर्धेत भारताच्या नावावर सर्वाधिक झेल सोडल्याचा विक्रम झाला आहे.

भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये आधीच ‘इम्पॅक्ट प्लेयर मेडल’ दिले जाते. हे मेडल सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिले जाते. आता या १०००० रुपयांची खेळाडूंमधील स्पर्धा समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---