---Advertisement---

T20 WC26: टीम इंडियाचा सराव सुरू, मात्र एका खेळाडूने वाढवली संघाची डोकेदुखी! अजुनही फिट…

On: मंगळवार, फेब्रुवारी 3, 2026 3:59 PM
---Advertisement---

गतविजेता भारत घरच्या मैदानावर पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने उतरणार आहे. टी२० विश्वचषक २०२६ येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोमाने तयारीला लागले आहेत. तिलक वर्माही पूर्णपणे फिट असून त्याने इंडिया ए संघाकडून खेळताना उत्तम कामगिरी केली. यामुळे संघाला धीर आला असला तरी एका खेळाडूने मात्र संघाची चिंता वाढवली आहे.

भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अजुनही फिट नाही, यामुळे त्याला सध्यातरी खेळण्यास परवागणी मिळालेली नाही. त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापत झाली होती. त्यातून तो अद्यापही सावरला नसल्याचे पुढे येत आहे.
विश्वचषकाला मोजकेच दिवस शिल्लक असताना सुंदरची ही फिटनेस अपडेट संघाच्या चिंतेत वाढ होण्याचे कारण ठरत आहे.

सुंदरची पुढील फिटनेस टेस्ट ४ फेब्रुवारीला केली जाणार आहे. यामुळे तो पुन्हा बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंलमध्ये फिटनेस टेस्टला सामोरा जाणार आहे. संघ व्यवस्थापक त्याच्या फिटनेसच्या रिपोर्टची प्रतिक्षा करत असून त्यांनी त्याच्या जागी बदली खेळाडू जाहीर केलेला नाही.

काही रिपोर्ट्सनुसार सुंदर लवकर दुखापतीतून सावरत आहे. त्यासाठी त्याने काही वेळ फलंदाजीही केली होती. तसेच त्याने २ फेब्रुवारीला ४ षटके गोलंदाजीही केली होती. आता त्याचे परत फलंदाजी आणि गोलंदाजीचे सेशन होणार असल्याने त्यानंतर अंतिम रिपोर्ट येणार आहे. यामुळे तो संघात असणार की नाही हे तेव्हाच कळेल.

भारताने त्याची जागा कोण घेणार हे जाहीर केले नसले तरी संघाकडे काही पर्याय उपलब्ध आहेत. इंडिया ए संघात सध्या रियान पराग आणि आयुष बदोनी खेळत आहेत, तर हे दोघे सुंदरला पर्यायी खेळाडू आहेत. बदोनीने युएसए विरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात चांगली कामगिरी केली होती.

या स्पर्धेत भारत ४ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म-अप सामना खेळणार आहे. त्यासाठी संघ मुंबईला पोहोचला असून या सामन्यासाठी संजू सॅमसनला अंतिम अकरामध्ये घेतात की नाही याकडे लक्ष असेल. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत वाईट कामगिरी केली होती. त्याने ५ सामन्यात केवळ ४६ धावा केल्या होत्या. दुसरीकडे इशान किशन चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने या मालिकेत त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---