आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून मागच्या वर्षी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचा टी-20 संघ तयार केला गेला आहे. मंगळवार (23 जानेवारी) ICC Men’s T20I Team of the Year for 2023 ची घोषणा सोमवारी आयसीसीकडून केली गेली. भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याला या संघाचा कर्णधार म्हणून निवडले गेले आहे. तसेच संघात सूर्यकुमारसह एकूण चार भारतीय खेळाडूंना निवडले गेले आहे.
‘आयसीसी मेन्स टी-20आंतरराष्ट्रीय टीम ऑफ द इयर’मध्ये (ICC Men’s T20I Team of the Year for 2023) मागच्या वर्षभरता सर्वोत्तम टी-20 प्रदर्शन करणाऱ्या 11 खेलाडूंना निवडले गेले आहे. या संघात भारतीय संघाचे चार, जिम्बाब्वे संघाचे 2, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि युगांडा या प्रत्येक संघाचे एक-एक खेळाडू आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव, सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी स्थान मिळवले आहे.
इंग्लंडचा फिल साल्ट, वेस्ट इंडीजचा निकोलस पुरन, आयर्लंडचा मार्क ऍडेयर, न्यूझीलंडचा मार्क चॅपमन, युगांडाचा अप्लेश रामजानी यांना संघात सामील केले गेले आहे. झिम्बाब्वेचे जे दोन खेळाडू या संघात आहेत, ते म्हणझेच सिकंदर रझा आणि रिचर्ड नगारवा. मागच्या वर्षी वनडे विश्वचषक असल्यामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही. पण खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये या सर्व खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले. (ICC Men’s T20I Team of the Year announced, Suryakumar Yadav becomes captain, ‘these’ three Indians also get a chance)
ICC Men’s T20I Team of the Year for 2023 (पुरुषांचा आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीयमधील सर्वोत्तम संघ) –
यशस्वी जयस्वाल, फिल साल्ट, निकोलस पुरन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क ऍडेयर, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा, अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का, अनुभवी खेळाडू खास कारणास्तव बाहेर
हार्दिक पंड्या मैदानात परतण्यासाठी घेतोय मेहनत, फोटो शेअर करून दिले संकेत