विश्वचषक 2023 वर्षी भारतात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील. याआधी 4 ऑक्टोबरला विश्वचषक उद्घाटन सोहळा होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. आयसीसीने हा दिवस आयसीसी कॅप्टन डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकापूर्वी 3 ऑक्टोबरला शेवटचा सराव सामना खेळवला जाणार आहे.
याआधी 4 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याला सर्व संघांचे कर्णधार उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान रंगारंग कार्यक्रम आणि मेगा इव्हेंट्स होतील. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करमार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानचे संघ 14 ऑक्टोबरला समोरो-समोर असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याच वेळी, विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची तयारी
यापूर्वी भारतीय संघ आशिया चषक 2023 च्या तयारीत आहे. भारतीय संघाचे खेळाडू सध्या एनसीए मध्ये सराव करत आहे. भारताच्या सततच्या चौथ्या क्रमांकावर अखेर शिक्कामोर्त लागला आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस आय्यर (Shreyas Iyer) च्या पुनरागमनामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे असे म्हणाता येईल.
कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट संघ देखिल मजबूत तयारी करत आहे. भारतीय संघाआधिच पाकिस्तानने आशिया चषकसाठी आपला संघ जाहिर केला आहे. पाकिस्तानने बाबर आझमच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. (icc mens world cup opning caremony oct 4 in narendra modi stadium)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, तब्बल सहा वर्षांनी अष्टपैलूचे पुनरागमन
कसोटीत तिहेरी शतक करणाऱ्या करुण नायरचा मोठा निर्णय, ‘या’ कारणास्तव सोडली कर्नाटक संघाची साथ