श्रीलंका क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Srilanka Tour Of Australia) आहे. उभय संघांमध्ये टी२० मालिका (AUSvSL T20 Series) खेळली जातेय. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला ऑस्ट्रेलिया संघाने विजयी घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला. सोबतच ते आयसीसीच्या एकदम नव्या नियमाचे शिकार ठरले. (ICC New Slow Over Rate Rule)
मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाला अखेरच्या काही षटकांमध्ये ३० यार्ड क्षेत्राबाहेर पाच ऐवजी चार क्षेत्ररक्षक उभे करण्यास सांगितले. आयसीसीच्या नव्या नियमानुसार, ८५ मिनिटात १९ षटके टाकणे अनिवार्य आहे. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी हा नियम पाळला नव्हता. संथगती षटकांबाबतचा हा नियम नव्या वर्षात लागू करण्यात आला आहे.
यापूर्वी संथ गतीने षटके टाकणाऱ्या संघाच्या कर्णधाराची सामना शुल्कातील काही रक्कम कपात करण्यात येत होती. तसेच एका वर्षात दोन वेळा ही चूक घडल्यास कर्णधाराला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात येत होते. तरीही, सातत्याने सर्व संघ अशी चूक करत होते.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका संघही तितक्याच धावा बनवू शकला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने केवळ चार धावा बनविल्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवणे सोपे गेले. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात वफादारी! ‘या’ ५ खेळाडूंनी कधीच दिला नाही संघमालकांच्या विश्वासाला तडा (mahasports.in)