आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(15 जानेवारी) 2019 या वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला घोषित झाला आहे.
आयसीसीचा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारा तो भारताचा एकूण तिसराच क्रिकेटपटू आहे. याआधी एमएस धोनीने 2 वेळा तर विराट कोहलीने 3 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे.
रोहितसाठी 2019 हे वर्ष खास ठरले आहे. रोहित 2019 वर्षातील सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 2019 या वर्षात 28 वनडे सामन्यात 7 शतकांसह 57.30 च्या सरासरीने 1490 धावा केल्या होत्या.
तसेच त्याने 2019 विश्वचषकातही शानदार कामगिरी करताना 5 शतके करण्याचा पराक्रम केला होता.
रोहितआधी एकूण 9 क्रिकेटपटूंना आयसीसीचा सर्वोत्तम वनडे पुरस्कार मिळाला आहे. या क्रिकेटपटूंची ही यादी –
आयसीसी सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू पुरस्कार विजेते –
2004 – अँड्र्यू फ्लिंटाॅफ
2005 – केविन पीटरसन
2006 – मायकेल हसी
2007 – मेथ्यु हेडन
2008 – एमएस धोनी
2009 – एमएस धोनी
2010 – एबी डिव्हीलियर्स
2011 – कुमार संगकारा
2012 – विराट कोहली
2013 – कुमार संगकारा
2014 – एबी डिव्हीलियर्स
2015 – एबी डिव्हीलियर्स
2016 – क्विंटन डिकाॅक
2017 – विराट कोहली
2018 – विराट कोहली
2019 – रोहित शर्मा
काल सपाटून पराभव झालेल्या विराटचा आज क्रिकेट जगतात या गोष्टीमुळे बोलबाला
वाचा????https://t.co/SdQ76lqGgL????#म #मराठी #Cricket #TeamIndia #ICCAwards @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020
संपूर्ण यादी – २००४ पासूनचे आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे मानकरी
वाचा????https://t.co/1ycs49yS1R????#म #मराठी #Cricket #TeamIndia #ICCAwards @benstokes38— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020






