भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेपूर्वी मोठा झटका लागला आहे. नुकतेच आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत विराट आणि रोहित यांचे नुकसान झाले आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत विराटला ८, तर रोहितला १२ गुणांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. काही दिवसांपूर्वी भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा मोठा पराभव मिळाला. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि रास्सी वॅन डर ड्यूसेन यांनी महत्त्वापूर्ण खेळी केली होती. याच कारणास्तव या दोन फलंदाजांना क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
नवीन एकदिवसीय क्रमवारीनुसार बाबर आजम ८७८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. विराटला ८ गुणांचे नुकसान झाले असले, तरी तो दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. रोहित शर्माही त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. रोहित आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर यांच्याकडे प्रत्येकी ८०१ गुण आहेत. टेलर चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताविरुद्ध जबरदस्त एकदिवसीय प्रदर्शन केल्यानंतर रस्सी वॅन डर ड्यूसनने (Rassie van der Dussen) १० स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता ड्यूसने १० व्या क्रमांकावर आला आहे आणि त्याने भारताविरुद्ध मालिकेत २१८ धावा केल्या होत्या. त्याचसोबत क्विंटन डी कॉक, ज्याने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत २२९ धावा केल्या होत्या. तो चार स्थानांच्या फायद्यासह ५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट आणि रोहित सोडून एकही भारतीय चेहरा पहिल्या १० मध्ये दिसत नाही. ऑस्ट्रेलयाचा ऍरॉन फिंच या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो सातव्या, तर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आठव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा केन विलियम्सन ९ व्या क्रमांकावर आहे.
🔹 Quinton de Kock continues his rise 🔼
🔹 Massive gains for Rassie van der Dussen 🔥
🔹 England players move up in the T20I charts 📈Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings 📝
Details 👉 https://t.co/Jxktm5FBsr pic.twitter.com/HBGUPKNHsT
— ICC (@ICC) January 26, 2022
एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) एकटाच आहे, जो पहिल्या १० मध्ये सामील आहे. बुमराह ६८९ गुणांसह ७ व्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्याकडे ७३७ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवुड गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंडचा क्रिस वोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान चौथ्या क्रमांकवर आहेत. तर पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा मेहदी हसन आहे.
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन
‘चौकार-षटकार मारूनच जिंकता येते, ही आताच्या तरुणांची विचारसरणी’, गावसकरांनी दीपक चाहरला फटकारले
व्हिडिओ पाहा –