---Advertisement---

प्रजासत्ताक दिन| पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जॉंटी ऱ्होड्स, ख्रिस गेलला खास पत्र; क्रिकेटपटूंच्या आल्या प्रतिक्रिया

On: बुधवार, जानेवारी 26, 2022 4:43 PM
---Advertisement---

भारतात ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic day)  मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी सर्व भारतीय एकमेकांना भेटतात आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असतात. तसेच सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील सोशल मीडियाव्दारे सर्वांना शुभेच्छा देत असतात. यात भारतातीलच नव्हे, तर परदेशी खेळाडूंचा देखील समावेश आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॉंटी ऱ्होड्स (Jonty Rhodes) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) याने शुभेच्छा देणारे ट्विट शेअर केले आहे.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ख्रिस गेल आणि जॉंटी ऱ्होड्स यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे पत्र लिहिले होते. याचा खुलासा या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंनी केला आहे. भारतावर जीवापाड प्रेम असणाऱ्या ख्रिस गेलने ट्विट करत लिहिले की, “मी भारतातील संपूर्ण जनतेला ७३ व्या गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रामुळे माझी सुरुवात खूप चांगली झाली आहे. माझे भारतातील नागरिकांसोबत आणि भारतासोबत असलेले चांगले संबंध पाहून त्यांनी मला खास संदेश पाठवला. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. सर्वांना युनिव्हर्स बॉस कडून शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम..”

तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉंटी ऱ्होड्सला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक खास पत्र पाठवले आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या पत्रात लिहिले की, “मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या काही वर्षांत तुम्ही भारत आणि इथल्या संस्कृतीशी घट्ट नाते निर्माण केले आहे. या महान देशाच्या नावावर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव ठेवले, तेव्हा हे सिद्ध झाले. आमच्या देशांमधील मजबूत संबंधांचे तुम्ही विशेष दूत आहात.”

तसेच हे पत्र शेअर करत जॉंटी ऱ्होड्सने लिहिले की, “तुमच्या या शब्दांसाठी नरेंद्र मोदीजी तुमचे आभार. प्रत्येक वेळी मी भारतात आलो, तेव्हा माणूस म्हणून मी खूप परिपक्व झालो आहे. माझे संपूर्ण कुटुंब भारतासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. मी भारतातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संविधानाच्या आदर करतो. जय हिंद.”

महत्वाच्या बातम्या :

वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर

बिनबाद ७०९ धावा करणारे भारतीय क्रिकेटर, ज्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ

हे नक्की पाहा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---