---Advertisement---

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 10:50 AM
---Advertisement---

आयसीसीने नुकतीच खेळाडूंची वनडे खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत असून, फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या आणि उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर गोलंदाजांच्या बाबतीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत विराट कोहलीने दोन अर्धशतक झळकावत क्रमवारीतील आपले पहिले स्थान कायम ठेवले. मागील बऱ्याच महिन्यांपासून एकही वनडे सामना न खेळूनही रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 5 स्थानांची झेप घेत तिसरा क्रमांक गाठला आहे. तर रॉस टेलर चौथ्या व ऍरोन फिंच पाचव्या क्रमांकावर आहेत.

आयर्लंडचा धाकड सलामी फलंदाज पॉल स्टर्लिंगने अफगाणिस्तान विरुद्ध सलग दोन शतके झळकावत 20 वे स्थान गाठले आहे. तर हशमतुल्लाह शाहिदी, राशिद खान आणि जावेद अहमदी यांनादेखील क्रमवारीत फायदा झाला आहे.

गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह सर्वोत्तम भारतीय गोलंदाज आहे. बुमराहने 700 अंकांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे . या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या तर अफगाणिस्तान फिरकीपटू मुजीब उर रहमान दुसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्टचे 722 तर मुजीबचे 701 अंक आहेत. बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसनने 9 स्थानांची मोठी झेप घेत चौथा क्रमांक पटकावला आहे. मेहदीने वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी करत 7 बळी मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---