---Advertisement---

विराटचं ठीक आहे, बाकी खेळाडूंची आयसीसी क्रमवारी नक्की पहा

On: शुक्रवार, नोव्हेंबर 2, 2018 4:38 PM
---Advertisement---

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार वन-डेमध्ये फलंदाजीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

विंडीज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत विराटने 453 धावा करत 15 गुण कमावले. यामुळे तो रोहितपेक्षा 28 गुणांनी पुढे असून त्याचे एकूण गुण 899 झाले आहेत. विराट हा कसोटी फलंदाजीतही पहिल्या क्रमांकावर आहे.

तसेच रोहितनेही विंडीज विरुद्ध विक्रमांची आणि धावांची बरसात करत 389 धावा केल्या. तो 871 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. इंग्लंडचा जो रूट 807 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विंडीज विरुद्धच्या मालिकेत भारतीय गोलंदाजानी उत्तम कामगिरी केली होती. यामुळे वन-डे मध्ये जसप्रीत बुमराह कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 841 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा पहिल्यांदाच पहिल्या दहामध्ये पोहचला असून तो आठव्या क्रमांकावर आहे.

तसेच विंडीज विरुद्ध सात विकेट्स घेत रवींद्र जडेजा 25व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर भुवनेश्वर कुमार 22व्या क्रमांकावर आहे.

आयसीसी वन-डे संघ क्रमवारी

इंग्लंड- 126

भारत – 121

न्युझीलंड- 112

दक्षिण आफ्रिका – 110

पाकिस्तान – 101

आयसीसी वन-डे फलंदाजी क्रमवारी

विराट कोहली -899

रोहित शर्मा – 871

जो रूट- 807

डेविड वॉर्नर – 803

बाबर आझम -798

आयसीसी वन-डे गोलंदाजी क्रमवारी

जसप्रीत बुमराह – 841

राशिद खान – 788

कुलदीप यादव – 723

ट्रेंट बोल्ट 699

जोश हॅजेलवूड 696

महत्त्वाच्या बातम्या :

विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया

ही दोस्ती तुटायची नाय… काय आहे या खास मैत्रीचे कारण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment