बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये भारतीय संघ वर्चस्व गाजवताना दिसत आहे. एवढंच नाही, तर वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघासोबतच खेळाडूही चमकले आहेत. रोहित शर्मा याला फायदा झाला आहे. फलंदाजांच्या यादीत भारताचे तीन खेळाडू टॉप 10मध्ये आहेत. तसेच, दोन गोलंदाज टॉप 10मध्ये आहेत. याव्यतिरिक्त अष्टपैलूंच्या यादीत भारताचा एकच खेळाडू टॉप 10मध्ये आहे.
भारतीय संघ अव्वलस्थानी
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) संघांची यादी पाहिली, तर त्यात भारतीय संघ अव्वलस्थानी विराजमान आहे. भारताची 118 रेटिंग आहे. भारतापाठोपाठ 115 पॉईंट्ससह पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका संघ असून त्यांचे 110 पॉईंट्स आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलिया (109) आणि पाचव्या स्थानी न्यूझीलंड (106) आहे.
फलंदाजांमध्ये शुबमन दुसऱ्या स्थानी कायम
याव्यतिरिक्त फलंदाजांच्या वनडे रँकिंगचा विचार केला, तर भारताचा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) 823 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) हा 747 रेटिंगसह डेविड वॉर्नर (David Warner) याच्यासोबत संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी आहे. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) याला एक स्थानाचा फायदा झाला असून तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. त्याची रेटिंग 725 इतकी आहे. याव्यतिरिक्त यादीत अव्वलस्थानी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) असून त्याची रेटिंग 829 आहे. बाबर आणि शुबमनमध्ये फक्त 6 रेटिंग्सचे अंतर आहे. अशात पुढील सामन्यात शुबमनने शानदार कामगिरी केली, तर तो बाबरच्या स्थानाला धक्का देऊ शकतो. तसेच, तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) असून त्याची रेटिंग 759 आहे. चौथ्या स्थानी डी कॉकचा संघसहकारी हेन्रीच क्लासेन असून त्याची रेटिंग 756 इतकी आहे.
In ODI ranking:
India – No. 1 team.
Gill – No. 2 ranked batter.
Kohli – No. 6 ranked batter.
Rohit – No. 8 ranked batter.
Siraj – No. 2 ranked bowler.
Kuldeep – No. 8 ranked bowler.
Hardik – No. 9 ranked all-rounder.The Domination of Indian cricket….!!!! pic.twitter.com/nUR9gexOuE
— Johns. (@CricCrazyJohns) October 25, 2023
गोलंदाजीत सिराज आणि कुलदीपचा समावेश
दुसरीकडे, गोलंदाजी रँकिंगविषयी बोलायचं झालं, तर अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड असून त्याची रेटिंग 670 आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. सिराजची रेटिंग 668 आहे. सिराजपाठोपाठ टॉप 10मध्ये कुलदीप यादव नवव्या स्थानी असून त्याची रेटिंग 632 आहे.
तसेच, अष्टपैलू खेळाडूंची रँकिंग पाहिली, तर त्यात टॉप 10मध्ये भारताचा फक्त एक धुरंधर आहे. तो म्हणजे हार्दिक पंड्या (Hardik Pandya). पंड्या या यादीत नवव्या स्थानी असून त्याची रेटिंग 219 आहे. यामध्ये अव्वलस्थानी शाकिब अल हसन असून त्याची रेटिंग 324 आहे. (icc odi rankings team india on top shubman gill on 2nd number in batting rankings)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, एका बदलासह विजयाच्या हॅट्रिकसाठी तयार; स्कॉटसेनेत कोणताच बदल नाही, Playing XI
‘दररोज 8 किलो मटण खातायेत…’, पाकिस्तानी खेळाडूच्या फिटनेसवर खवळला Wasim Akram, ‘असा’ काढला राग