जगभरातील क्रिकेटप्रेमी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची प्रतीक्षा करत आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. यावर्षी ही स्पर्धा भारतात खेळली जाणार आहे. अशात या स्पर्धेपूर्वी आजी-माजी खेळाडू स्पर्धेच्या विजेत्यांबाबत भविष्यवाणी करताना दिसत आहेत. यामध्ये ‘दादा’ म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार सौरव गांगुली याचाही समावेश आहे. गांगुलीने स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दावेदार असणाऱ्या 5 संघांबाबत भविष्यवाणी केली आहे.
सौरव गांगुलीची भविष्यवाणी
भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी दावेदार असणाऱ्या संघांबाबत मोठे विधान केले आहे. गांगुलीनुसार, भारत नेहमीच विश्वचषकासाठी दावेदार राहिला आहे. मात्र, याव्यतिरिक्त इतर चार संघही आहेत, जे यावेळी विश्वचषकात चांगले प्रदर्शन करू शकतात आणि विश्वचषक जिंकू शकतात.
कोणत्या संघांची घेतली नावे?
गांगुलीने भारतासह पाच संघांना विश्वचषक विजेतेपदासाठी दावेदार म्हटले. गांगुलीने कोलकाता येथे शुक्रवारी (दि. 18 ऑगस्ट) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “भारत नेहमीच विश्वचषकाच्या दावेदारांमध्ये सामील असतो. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघही यावेळी दावेदारांच्या यादीत सामील आहेत. न्यूझीलंड संघ मोठ्या स्पर्धांमध्ये चांगला खेळतो.”
तिलक वर्माबाबत मोठे भाष्य
याव्यतिरिक्त गांगुलीने भारतीय संघाच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाच्या पर्यायाबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला की, “आमच्याकडे भरपूर खेळाडू आहेत. तिलक वर्माला चौथ्या स्थानावर आजमावले जाऊ शकते. तो खूपच प्रतिभावान खेळाडू आहे.”
स्पर्धेचा पहिला सामना
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात अहमदाबाद येथे खेळला जाईल. दुसरीकडे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात खेळला जाईल. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथेच खेळला जाईल. यावर्षी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. अनेक क्रिकेट जाणकारांना विश्वास आहे की, भारतीय संघाला मायदेशातील मैदानांचा आणि प्रेक्षकांचा फायदा मिळेल. (icc odi world cup 2023 dada sourav ganguly statement on world cup 2023 contenders)
महत्त्वाच्या बातम्या-
रिंकूबाबत KBCमध्ये विचारला गेला 6.40 लाख रुपयांचा प्रश्न, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहितीये उत्तर
‘यांच्या’मुळे जबरदस्त कमबॅक करू शकलो! आयर्लंडला पहिल्या टी-20त मात दिल्यानंतर बुमराहची खास प्रतिक्रिया