भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत असली, तरीही भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. यात विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन रवींद्र जडेजा यांसारखी अनेक नावे आहेत. मात्र, या सर्वांमध्ये विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे, जो आपला चौथा विश्वचषक खेळेल.
विराट कोहलीचा चौथा विश्वचषक
‘रनमशीन’ नावाने ओळखला जाणारा विराट कोहली वनडे विश्वचषक 2023 (Virat Kohli World Cup 2023) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात उतरताच 4 वेळा विश्वचषक (Virat Kohli’s 4th World Cup) खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल. तो यापूर्वी 2011, 2015 आणि 2019 विश्वचषकात खेळला होता. या यादीत आधीपासूनच अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपला तिसरा विश्वचषक खेळला आहे. तसेच, चार विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर त्यात कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, एमएस धोनी यांसारख्या नावांचा समावेश आहे. आता या यादीत विराट कोहली याच्या नावाचाही समावेश झाला आहे.
अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण 6 विश्वचषक खेळले आहेत. त्यामुळे तो या यादीत अव्वलस्थानी आहे. सचिन पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांच्यासोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी आहे. त्यांच्याही नावावर 6 विश्वचषकात खेळण्याचा विक्रम आहे. त्यांच्याव्यतिरिक्त रिकी पाँटिंग, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस यांसह इतर अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी 5-5 वनडे विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
वयाच्या 22व्या वर्षी खेळला होता पहिला विश्वचषक
विराट कोहली याचे वय 2011मध्ये 22 वर्षे इतके होते. याच वयात त्याला वनडे विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात 83 चेंडूत नाबाद 100 धावांची शतकी खेळी साकारली होती. यानंतर विराटने वेस्ट इंडिजविरुद्धही शानदार 59 धावा केल्या होत्या. तसेच, अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूत 35 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. (icc odi world cup 2023 star cricketer virat kohli play fourth world cup of his career)
हेही वाचा-
विश्वचषकापूर्वी पाऊस जिंकतोय सराव सामने, ऑस्ट्रेलिया-नेदर्लंड लढत अर्ध्यात सुटली
World Cup Countdown: वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याची हॅट्रिक करणारी ऑस्ट्रेलिया