क्रिकेटप्रेमींना आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धांची उत्सुकता लागली आहे. दीर्घ काळानंतर भारतीय संघ वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज झाला आहे. असे म्हटले जात आहे की, आयसीसी स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा लवकरच करणार आहे. अशातच भारतात खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकाच्या ठिकाणांविषयी मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर, विश्वचषकातील सामने जिथे खेळले जाणार आहेत, त्या 12 शहरांच्या नावाचा खुलासा झाला आहे.
‘या’ 12 शहरांमध्ये खेळले जातील सर्व सामने
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धेचे सर्व सामने एकूण 12 शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरम, मुंबई, अहमदाबाद, पुणे, लखनऊ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धरमशाला या 12 शहरांमध्ये विश्वचषकातील सर्व सामने खेळले जातील. असे म्हटले जात आहे की, स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाईल. या सामन्याचे आयोजन अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होईल.
भारत-पाकिस्तान 15 ऑक्टोबर येणार आमने-सामने?
विश्वचषकासाठी बीसीसीआयने ड्राफ्ट केलेल्या वेळापत्रकानुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ नरेंद्र मोदी स्टेडिअमवर एकमेकांचा सामना करू शकतात. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबाद येथे खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मते, बाद फेरीतील सामनाच गुजरातच्या या स्टेडिअमवर खेळतील.
इंग्लंडने मारली होती बाजी
वनडे विश्वचषकाचा अखेरचा विश्वचषक इंग्लंडमध्ये 2019मध्ये खेळला गेला होता. स्पर्धेचा अंतिम सामना रंजक पद्धतीने पार पडला होता. इंग्लंड संघाने न्यूझीलंडचे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न तोडले होते. दोन्ही संघांतील हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. विशेष म्हणजे, इथेही इंग्लंड-न्यूझीलंड संघाची धावसंख्या एकसारखी होती. मात्र, सामन्यात सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. (icc ODI world cup 2023 venue these 12 states will host odi wc matches in india know here)
महत्वाच्या बातम्या-
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा
वडिलांच्या वाढदिवशी आठवण काढत कृणाल पंड्या भावूक, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…