आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द डिकेड’ अर्थात ‘आयसीसी दशकातील सर्वात्तम खेळाडू’ पुरस्कारासाठी जगातील ७ सर्वोत्तम नावांची घोषणा केली आहे. या ७ खेळाडूंमध्ये दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. ज्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या नावाचाही समावेश आहे. अन्य खेळाडूंमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
‘आयसीसीच्या दशकातील सर्वात्तम खेळाडू’ साठी या ७ खेळाडूंमधून होणार एकाची निवड
विराट कोहली- भारत, जो रुट- इंग्लंड, केन विलियमसन- न्यूझीलंड, एबी डिवीलियर्स- दक्षिण आफ्रिका, स्टिवन स्मिथ- ऑस्ट्रेलिया, आर अश्विन- भारत, कुमार संगकारा- श्रीलंका
आयसीसीने निवड केलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीला पहिले स्थान देण्यात आले आहे तर भारतीय फिरकीपटू आर अश्विनला सहावे स्थान देण्यात आले आहे. सातव्या स्थानावर श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. संगकाराने २०१५मध्ये क्रिकेटला अलविदा केला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अन्य खेळाडूंपैकी या यादीत एबी डिविलियर्सच्या नावाचाही समावेश आहे.
विराटला आहे सर्वात मोठी संधी
या यादीतील नाव निवडताना २०१० ते २०१९ दरम्यानच्या काळातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे. तसं पाहिलं तर याच आधारावर विराटने अन्य खेळाडूंच्या तुलनेत या काळात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने या दशकात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तसेच या काळात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो अव्वल आहे. विराटची सरासरी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या दशकात ५०च्या वर राहिली आहे.
गेल्या दशकात विराटने २०९० चौकारांच्या मदतीने १८ हजार ७२६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६३ शतकांचा समावेश आहे.
आयसीसी दशकातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू:
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (भारत), सुझी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) आणि झूलन गोस्वामी (भारत).
आयसीसी दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू:
एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सुझी बेट्स (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज), मिताली राज (भारत), सारा टेलर (इंग्लंड).
आयसीसी पुरुषांचा दशकातील सर्वोत्तम वनडे संघ:
विराट कोहली (भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका), रोहित शर्मा (भारत), एमएस धोनी (भारत), कुमार संगकारा (श्रीलंका)
आयसीसी पुरुषांचा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ:
विराट कोहली (भारत), केन विलियम्सन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड), रंगना हेरथ (श्रीलंका), यासिर शाह (पाकिस्तान).
आयसीसी पुरुषांचा दशकातील सर्वोत्तम टी२० संघ:
राशिद खान (अफगाणिस्तान), विराट कोहली (भारत), इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका), ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया), लसिथ मलिंगा (श्रीलंका), ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) आणि रोहित शर्मा (भारत).
आयसीसी दशकातील सर्वोत्तम टी२० महिला क्रिकेटपटू:
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सोफी डिवाईन (न्यूझीलंड), एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया), डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया) आणि आन्या श्रुबसोले (इंग्लंड)
आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट ऑफ डिकेड पुरस्कार:
विराट कोहली (भारत), केन विलियम्सन (न्यूझीलंड), ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड), मिस्बाह उल हक (पाकिस्तान), एमएस धोनी (भारत), आन्या श्रुबसोले (इंग्लंड), कॅथरीन ब्रंट (इंग्लंड), माहेला जयवर्धने (श्रीलंका) आणि डॅनियल विटोरी (न्यूझीलंड).
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला रोहित आणि ईशांत मुकण्याची शक्यता
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात