रिषभ पंत-जो रूट आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराच्या शर्यतीत! ‘या’ निकषावर ठरणार विजेता

मंगळवारी आयसीसी अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने जानेवारी महिन्याच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी शर्यतीत असलेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार प्रदर्शन करणाऱ्या रिषभ पंतचा तसेच श्रीलंका दौऱ्यात धावांचा पाऊस पाडणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा समावेश आहे. या दोघांव्यतिरिक्त आर्यलंडच्या पॉल स्टर्लिंगलाही नामांकन मिळाले आहे.

आयसीसीने नुकतेच दर महिन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. या पुरस्काराचे मानकरी ठरविण्याचा अधिकार तज्ञांबरोबरच चाहत्यांना देखील आहे. चाहत्यांनी दिलेल्या मतांच्या आधारावर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पुरस्काराचे मानकरी ठरवले जातील. तीन नामांकित खेळाडूंपैकी एक खेळाडू या पुरस्काराचा मानकरी असेल.

या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या तीनही खेळाडूंनी जानेवारी महिन्यात अतिशय दमदार कामगिरी केली होती. रिषभ पंतने ऑस्ट्रेलियात सिडनी कसोटीत ९७ धावांची तर ब्रिस्बेन कसोटी नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने श्रीलंकेविरुद्ध २२८ आणि १८६ धावांच्या झुंजार खेळी केल्या होत्या. या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या तिसऱ्या खेळाडूने म्हणजेच पॉल स्टर्लिंगने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन आणि युएई विरुद्धच्या दोन वनडे सामन्यात दमदार कामगिरी केली होती.

महिला क्रिकेटपटूंच्या विभागातही आयसीसीने ही नामांकने जाहीर केली आहेत. यात पाकिस्तानच्या दियाना बेग, दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल आणि दक्षिण आफ्रिकेच्याच मारिजाने कॅपचा समावेश आहे. दियाना बेगने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे आणि दोन टी-२० सामन्यात नऊ बळी पटकाविले आहेत. याच मालिकेत शबनम इस्माईलने सात बळी घेतले आहेत. याशिवाय मारिजाने कॅपने या मालिकेत ११५ धावा काढल्या असून तीन बळी घेतले आहेत.

आयसीसीच्या समितीने प्रत्येक विभागासाठी तीन नावांची घोषणा केली आहे. या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर एम अश्विनने काढली स्वर्गीय आईची आठवण, लिहली भावनिक पोस्ट

ब्रेकिंग! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौरा केला स्थगित

भारतीय संघात निवड न झाल्यानंतर आली नटराजनची प्रतिक्रिया, म्हणाला

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.