जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारपासून (१८ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना साउथॅम्प्टनमधील द एजस बाऊल या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आपली ११ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पूर्ण क्रिकट विश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले आहे की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला- वहिला विजेता कोण असेल? पूर्ण २ वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी एक फोटोशूट केले आहे, ज्यात खेळाडूंनी चांगलीच मस्ती केली आहे. आयसीसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये फोटोशूटदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल हे फोटोशूट दरम्यान मजा- मस्ती करत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ईशांत शर्मा हा फोटोशूटसाठी आक्रमक पोझ देत आहे आणि ईशांतच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून सलामीवीर फलंदाज मयंकला हसू आवरता येत नाहीयेत. मयंक हा त्याच्या मोबाईलमध्येही इशांतचे फोटो घेत आहे आणि ईशांतकडे बघून तो त्याचे हसू थांबवू शकत नाही.
https://www.instagram.com/p/CQOKyxjrwHY/?utm_source=ig_web_copy_link
यानंतर मयंक अगरवाल फोटोशूट करण्यासाठी पोझ देत असतो. त्यावेळी ईशांत अचानक त्याचा हेअरस्टायलिस्ट बनतो. त्याने कंगवा घेऊन मयंकचे केस ठीक करण्यास सुरुवात केली. आयसीसीने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
ईशांत शर्मा खेळणार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना
गुरुवारी (१७ जून) भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपल्या अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की, भारतीय संघासाठी तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मापैकी कोण असेल? या चर्चांवर गुरुवारी बीसीसीआयने पूर्णविराम लावला आहे. ईशांत शर्मा हा भारताच्या अंतिम ११ मध्ये खेळणार आहे.
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने ही ईशांत शर्माला अंतिम सामन्यात खेळवण्याच्या निर्णयाबदल सहमती दर्शवली आहे. लक्ष्मणने स्टार स्पोर्स्ट्सवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ शोमध्ये बोलताना सांगितले की, “ज्याप्रकारे मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि भारतात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ज्याप्रकारे त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते, त्याची मी प्रशंसा करेल. मात्र, मला असे वाटते की, ईशांत शर्माचे संघाला पुढे नेण्यात एक महत्वाचे योगदान आहे. आपण ते विसरले नाही पाहिजे.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ या प्रकारे-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट काहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा
सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली