फिफा विश्वचषकानंतर फुटबॉल जगतातील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युरो कपचा थरार यूरोपमधील ११ विविध देशांमध्ये सुरू आहे. सध्या स्पर्धेतील साखळी सामने खेळले जातायेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या २४ संघांपैकी सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचा मान इटलीच्या संघाने मिळवला. बुधवारी (१६ जून) उशीरा झालेल्या सामन्यात त्यांनी स्वित्झर्लंडला पराभूत केले.
इटलीची उपांत्यपूर्व फेरीत धडक
रोम येथे युरो कपमधील अ गटातील तिसरा साखळी सामना बुधवारी उशिरा खेळला गेला. जॉर्जिओ चिलीनीच्या नेतृत्वातील इटली संघाने स्वित्झर्लंडवर ३-० अशी मात केली. मिडफिल्डर मॅन्युएल लोकोटेलीने २६ व्या तसेच ५२ व्या मिनिटाला दोन गोल केले, तर सीरो इमोबाईलने सामना संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना ८९ व्या मिनिटाला गोल केला.
इटलीने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात तुर्कीवर देखील ३-० अशा फरकाने विजय मिळवला होता. या सामन्यात इमोबाईलसह डेमिरल व इनसिगन यांनी प्रत्येकी एक गोल झळकावलेला.
इटलीची आघाडी
इटलीने अ गटात दोन सामने जिंकून प्रथम स्थान मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. इटलीचा संघ २०१८ फिका विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नव्हता. मात्र त्यानंतर त्यांनी सलग २९ सामन्यात अपराजित राहण्याची कामगिरी करून दाखवली. अ गटामध्ये दुसऱ्या स्थानी गॅरेथ बेल याच्या नेतृत्वातील वेल्स संघ आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडला १-१ अशा बरोबरीत रोखले होते. स्वित्झर्लंड गोलफरकामुळे तिसऱ्या स्थानी तर, तुर्की एकही गोल न झळकल्याने अखेरच्या स्थानी आहे.
अकरा विविध देशात खेळली जात आहे स्पर्धा
युरो कपची १६ वी आवृत्ती २०२० मध्ये खेळवली जाणार होती मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. कोणत्याही स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच असे होत आहे की एकच स्पर्धा तब्बल ११ देशांमध्ये खेळली जात आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्या नेतृत्वातील पोर्तुगाल संघ २०१६ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या स्पर्धेचा विजेता होता.
महत्त्वाच्या बातम्या –
खुद्द सचिन तेंडुलकरने दिला WTC फायनलपूर्वी न्यूझीलंड फलंदाजांना ‘हा’ महत्त्वपूर्ण सल्ला
आयपीएल आणि पीएसएलीची तुलनेबद्दल राशिद खानने दिलेले उत्तर ऐकून व्हाल खूश