भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा क्रिकेटविश्वातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. नेतृत्व, फलंदाज आणि यष्टीरक्षण या तीनही आघाड्यांवर तो आपल्या कारकीर्दीत यशस्वी ठरला. अनेक युवा खेळाडू धोनीला आपला आदर्श मानतात. भारताचा सध्याचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत व धोनी यांची नेहमी तुलना केली जाते. मात्र, पंतला ही तुलना आवडत नसल्याचे त्याच्याच संघसहकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
पंतला आवडत नाही धोनीशी केलेली तुलना
सध्या तिनही प्रकारात भारतीय संघाचा अव्वल यष्टीरक्षक असलेल्या रिषभ पंतची तुलना कायम एमएस धोनीशी केली जाते. धोनीप्रमाणे पंतदेखील कारकीर्दीच्या सुरुवातीपासून भारतीय संघाचा मॅचविनर ठरला आहे. दोघांमधील या साधर्म्यामूळे पंतला धोनीचा वारसदार म्हटले जाते. परंतु, धोनीशी होणारी ही तुलना पंतला आवडत नसल्याचे त्याचा दिल्ली रणजी संघातील साथीदार नितीश राणा याने म्हटले आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या नितीश राणा याने नुकताच एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यामुलाखतीत बोलताना राणा म्हणाला, “रिषभला धोनीशी केली जाणारी तुलना अजिबात आवडत नाही. तो त्याचा आवडता खेळाडू आहे. इतकेच नव्हे तर, त्याला झोपेत जरी आवडता खेळाडू विचारला तरी तो धोनीचे नाव घेईल. मी त्याच्या तुलनेच्या पात्रतेचा नाही, असे तो म्हणतो. एक वेळ मी खेळायचे सोडील पण माझी तुलना करायचे बंद करा असे तो मला एकदा म्हणालेला.”
दिल्ली संघातील सहकारी आहेत रिषभ आणि राणा
रिषभ पंत आणि नितीश राणा हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात. राणा हा वरिष्ठ असला तरी, रिषभ मागील तीन वर्षापासून भारतीय संघात खेळत आहे. जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात नितीश राणाची प्रथमच निवड झाली असून, तो मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा
सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली
खुद्द सचिन तेंडुलकरने दिला WTC फायनलपूर्वी न्यूझीलंड फलंदाजांना ‘हा’ महत्त्वपूर्ण सल्ला