दक्षिण आफ्रिका येथे नोव्हेंबर 2022 रोजी महिला टी20 विश्वचषकाचे आयोजन होणार होते. मात्र, या वर्षी खेळाडू इतर क्रिकेट स्पर्धेत व्यस्त असतील. त्यामुळे खेळाडूंवरील ताण व इतर बाबींचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी (19 नोव्हेंबर) विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे ढकलली महिला टी20 विश्वचषक स्पर्धा
आयसीसीने गुरुवारी एक मोठा निर्णय घेत 2022 मध्ये होणारी महिला टी20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली आहे. आयसीसीने यापूर्वी 2021 मध्ये होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ही स्पर्धा आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.
सन 2023 मध्ये होईल स्पर्धा
आयसीसीने घेतलेल्या निर्णयानुसार आता महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये होणार आहे. ही स्पर्धा 9 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 26 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.
सन 2022 मध्ये होईल राष्ट्रकुल स्पर्धा
सन 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसह 3 मोठया क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये महिला क्रिकेटपटू सहभागी होतील. त्यामुळे टी20 विश्वचषक 2023 मध्ये आयोजित केला जाईल.
आयसीसीने विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये बदलला क्रमवारीचा आधार
आयसीसीने गुरुवारी आणखी एक मोठा निर्णय घेत विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या क्रमवारीचा आधार बदलला आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आता विजयी टक्केवारी गुणांच्या आधारे संघांची क्रमवारी निश्चित केली जाईल.
भारतीय संघ दुसऱ्या स्थानी
आयसीसीच्या या निर्णयानंतर विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघ दुसर्या स्थानी आला आणि ऑस्ट्रेलिया संघ प्रथम क्रमांकावर पोहोचला.
महत्त्वाच्या बातम्या –
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपसाठी नवीन नियम लागू; भारताला झाला तोटा
‘आर्थिक फायद्यासाठी भारताला मिळतील सोप्या खेळपट्ट्या’, माजी पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त वक्तव्य
‘बुमराह असेल भारताचा हुकमी एक्का’, ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज गोलंदाजाने केले कौतुक