नवीन वर्षासह, आयसीसीने नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. खराब कामगिरीमुळे या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे नुकसान झाले असतानाच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत नवा विक्रम रचला आहे.
जसप्रीत बुमराह अशा स्थानावर पोहोचला आहे जिथे आजपर्यंत कोणताही भारतीय गोलंदाज पोहोचू शकला नाही. बॉक्सिंग डे कसोटीत 5 बळींसह एकूण 9 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल स्थानावर आपली पकड आणखी मजबूत केली आहे. एवढेच नाही तर जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 907 रेटिंग गुण मिळवले आहेत. याआधी, कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत 904 पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवता आले नव्हते. आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम रेटिंग गुण मिळवणारा पॅट कमिन्स हा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे. कमिन्सच्या नावावर ऑगस्ट 2019 मध्ये 914 रेटिंग गुण होते.
🚨 JASPRIT BUMRAH – INDIA’S HIGHEST RATED BOWLER IN HISTORY WITH 907 POINTS. 🚨 pic.twitter.com/M3CVxSYnrW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 1, 2025
फक्त एका आठवड्यापूर्वी, जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुण मिळवणारा दुसरा भारतीय बनला आणि रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली. अश्विनला डिसेंबर 2016 मध्ये 904 रेटिंग गुण मिळाले होते. आता बुमराहने 907 रेटिंग मिळवून भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये सर्वोत्तम रेटिंगच्या रूपात बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे बक्षीस मिळाले आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत 4 सामन्यांच्या 8 डावात 30 बळी घेतले आहेत. त्याच्या आजूबाजूला दुसरे गोलंदाज नाहीत.
कसोटीत सर्वोच्च रेटिंग गुण असलेला भारतीय गोलंदाज
907- जसप्रीत बुमराह 2024
904 – आर अश्विन 2016
899 – रवींद्र जडेजा 2017
877 – कपिल देव 1980
859 – अनिल कुंबळे 1994
811 – विनू मांकड 1952
806 – सुभाष गुप्ते 1956
हेही वाचा-
शेवटची कसोटी ड्राॅ राहिली, तर भारत WTCच्या फायनलमध्ये पोहोचणार का? कसं आहे समीकरण
‘जसप्रीत बुमराह नसता तर बीजीटी एकतर्फी…’, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा दावा
IND vs AUS; स्टीव्ह स्मिथने यशस्वी जयस्वालवर केला आरोप, म्हणाला…