---Advertisement---

एका शतकासह सूर्यकुमारने बदलले टी२० रँकिंगचे गणित, रोहित-इशानलाही मागे सोडत ठरला ‘दादा’

On: बुधवार, जुलै 13, 2022 7:46 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा नेहमीच त्याच्या दमदार प्रदर्शनाने व्वाह व्वाह लुटत असतो. इंग्लंड विरुद्ध भारत संघात नॉटिंघम येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात तर त्याने खणखणीत शतक ठोकले होते. त्याच्या या शतकी खेळीचे बक्षिस त्याला आता मिळाले आहे. सूर्यकुमारने आयसीसीच्या टी२०तील फलंदाजी क्रमवारीत लांब उडी घेतली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात (Third T20I) सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) ५५ चेंडूत ११७ धावांची शानदार खेळी खेळली होती. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि १४ चौकारही मारले होते. या दमदार खेळीनंतरही तो भारतीय संघाला तो सामना जिंकवून देऊ शकला नव्हता. भारताने १७ धावांनी तो सामना गमावला होता. मात्र या दमदार खेळीचा फायदा सूर्यकुमारला आयसीसीच्या टी२० क्रमवारीत (ICC T20I Ranking) झाला आहे.

बुधवारी (१३ जुलै) आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी२० क्रमवारीत सूर्यकुमारने तब्बल ४४ स्थानांनी उडी घेतली आहे. सूर्यकुमार यापूर्वी फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत ४९ व्या स्थानावर होता. मात्र आता तो थेट पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्या खात्यात ७३२ गुण आहेत. 

पहिल्या १० जणांमध्ये एकमेव भारतीय
सूर्यकुमारने ही मोठी झेप घेत केवळ परदेशी फलंदाजांनाच नव्हे भारतीय फलंदाजांनाही मागे सोडले आहे. तो फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत पहिल्या १० जणांमध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. मागील आठवड्यापर्यंत युवा भारतीय सलामीवीर इशान किशन फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत पहिल्या १० जणांमध्ये होता. मात्र आता तो या यादीतून बाहेर पडला आहे. ताज्या टी२० क्रमवारीत तो ५ स्थानांनी घसरला असून १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्मा आणि केएल राहुल अनुक्रमे १८ व १९व्या क्रमांकावर आहेत.

https://twitter.com/ICC/status/1547145786764316673?s=20&t=K9X1ptDcQgnm-LrNuo_Gqg

बाबर आझम अव्वलस्थानी कायम
ताज्या फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत आताही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हाच प्रथमस्थानी कायम आहे. त्याच्या खात्यात सर्वाधिक ८१८ गुण आहेत. त्याचाच सलामी जोडीदार मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ऍडेन मार्करम आणि डेविड मलान सूर्यकुमारच्या पुढे आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

किती गोड! रोहित शर्माने ‘त्या’ चिमुकलीची भेट घेत जिंकली मने, चॉकलेट आणि टेडीही दिला भेट

बुमराहसोबतच्या जुगलबंदीचे शमीने उलगडले रहस्य, आगामी सामन्यांसाठीची योजनाही केली स्पष्ट

तैमूरला घेऊन ओव्हल वनडे पाहायला आला होता सैफ अली खान, स्टेडियममधील फोटोंनी वेधलंय लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---