आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी ट्रॉफी टूर जारी केली आहे. बीसीसीआयच्या आक्षेपानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार नाही. आयसीसीनं पाकिस्तानचा पीओके प्लॅन रद्द केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा 16 नोव्हेंबरला इस्लामाबाद येथून सुरू होणार आहे. दौऱ्याचं शेवटचं ठिकाण भारत आहे. यानंतर ट्रॉफी पुन्हा पाकिस्तानात जाईल.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स ट्रॉफी पीओकेमध्ये नेण्याची इच्छा होती. मात्र बीसीसीआयच्या आक्षेपानंतर त्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाही. आता आयसीसीनं ट्रॉफी टूरचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही टूर 16 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 26 जानेवारीपर्यंत चालेल. ट्रॉफी 26 जानेवारीला भारतात राहील. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.
आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. इस्लामाबादनंतर ट्रॉफी अबोटाबाद, मुरी, नाथिया गली आणि कराची येथे जाईल. यानंतर ती 26 ते 28 नोव्हेंबरपर्यंत अफगाणिस्तानमध्ये राहील.
अफगाणिस्ताननंतर चॅम्पियन्स ट्रॉफी बांगलादेशमध्ये जाणार आहे. येथे ही ट्रॉफी 10 ते 13 डिसेंबरपर्यंत असेल. यानंतर 15 ते 22 डिसेंबरदरम्यान ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाणार आहे. ती 25 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियात राहील. यानंतर 6 ते 11 जानेवारीपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहणार आहे. ट्रॉफी 12 ते 14 जानेवारी दरम्यान इंग्लंडमध्ये राहील. त्यानंतर ती भारतात पोहोचेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं संपूर्ण वेळापत्रक
16 नोव्हेंबर – इस्लामाबाद, पाकिस्तान
17 नोव्हेंबर – तक्षशिला आणि खानपूर, पाकिस्तान
18 नोव्हेंबर – अबोटाबाद, पाकिस्तान
19 नोव्हेंबर – मुरी, पाकिस्तान
20 नोव्हेंबर – नाथिया गली, पाकिस्तान
22-25 नोव्हेंबर – कराची, पाकिस्तान
26-28 नोव्हेंबर – अफगाणिस्तान
10-13 डिसेंबर – बांगलादेश
15-२२ डिसेंबर – दक्षिण आफ्रिका
25 डिसेंबर – 5 जानेवारी – ऑस्ट्रेलिया
6 -11 जानेवारी – न्यूझीलंड
12-14 जानेवारी – इंग्लंड
15-26 जानेवारी – भारत
27 जानेवारी – स्पर्धेचं सुरुवात ठिकाण – पाकिस्तान
हेही वाचा –
भारताचा सर्वात मोठा मॅचविनर परतला! रणजी ट्रॉफीमध्ये बॅट अन् बॉलनं जबरदस्त कामगिरी
दणदणीत मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले…
भारतीय संघ अडचणीत! पहिल्या कसोटीपूर्वी आणखी एक मोठा फलंदाज जखमी