---Advertisement---

रमीज राजांनी सुचवलेली ‘ती’ मालिका होणार का? आयसीसी म्हणते…

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 3:34 PM
babar-virat
---Advertisement---

क्रिकेटमधील सर्वात मनोरंजक प्रकार असलेल्या टी२० क्रिकेटच्या अनेक लीग सातत्याने उदयास येत असतात. आजकाल प्रत्येक देशात स्वतःची क्रिकेट लीग असलेली पाहायला मिळते. त्याचवेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा (PCB Chief Ramiz Raza) यांनी एका आगळ्यावेगळ्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेचा प्रस्ताव नुकताच सर्वांसमोर ठेवला होता. आता, या प्रस्तावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपली प्रतिक्रिया दिली आहे. (ICC On Ramiz Raza Proposal)

काय होता प्रस्ताव?
पाकिस्तानचे माजी कर्णधार व विद्यमान पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी काही दिवसांपूर्वी वीट करत एका रंजक आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला होता. त्यांनी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या चार देशांदरम्यान दरवर्षी एक चौरंगी टी२० मालिका खेळली जावी व दरवर्षी वेगवेगळे देश या स्पर्धेचे यजमानपद भूषवेल, असा प्रस्ताव ठेवला होता. यातून प्रेक्षकांचे मनोरंजन व आयसीसीला आर्थिक फायदा होईल, असे राजा यांनी मत मांडले होते. (Ramiz Raz Quadrangular Series Proposal)

https://twitter.com/iramizraja/status/1480961596197384192?t=pw612uvtf1N4NRcLjtycTg&s=19

आयसीसीची आली प्रतिक्रिया
राजायांच्या या प्रस्तावावर आता आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ ऍलॉर्डिस यांनी याबाबत बोलताना म्हटले,
“आम्हाला राजा अथवा कोणत्याही क्रिकेट बोर्डाने प्रस्ताव दिलेला नाही. याबाबतचे अधिकृत प्रस्ताव आल्यानंतरच अशा मालिकेचे भवितव्य सांगता येईल.”

चारही देश कट्टर प्रतिस्पर्धी
क्रिकेट जगतातील सर्वात परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणून भारत-पाकिस्तान (INDvPAK) व इंग्लंड-ऑस्ट्रेलिया (ENGvAUS) यांच्याकडे पाहिले जाते. इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित ऍशेस कसोटी मालिका (Ashes Test Series) खेळली जाते. तर, दुसरीकडे भारत-पाकिस्तान हे शेजारी असल्यामुळे पारंपरिक विरोधक बनले आहेत. मात्र, राजकीय तणावामुळे या दोन्ही देशांमध्ये सध्या द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटच्या ‘त्या’ वर्तनावर भडकला गंभीर! ‘…तुम्ही कधीच रोल मॉडेल बनू शकत नाही’ (mahasports.in)

इंग्लंडकडून पदार्पण करणारा ६९९ वा खेळाडू असूनही बिलिंग्सला मिळाली ७०० क्रमांकाची कॅप, वाचा त्यामागची ईनसाईड स्टोरी (mahasports.in)

SAvsIND, 3rd Test, Live: चौथ्या दिवसाला सुरुवात, द.आफ्रिकेला विजयासाठी १११ धावांची, तर भारताला ८ विकेट्सची गरज (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---