भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी आयसीसीने भारतातील पीच क्युरेटर्सना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आयसीसीने भारतीय क्युरेटर्सना स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी अशी खेळपट्टी तयार करू नये, ज्यामध्ये नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असेल. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, खेळपट्टीवर अतिरिक्त गवत असायला हवे आणि सीमारेषाही लांब असावी.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात विश्वचषक होणार आहे आणि या काळात नाणेफेकीची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. या काळात रात्री खूप दव पडते आणि त्यामुळे संघाच्या गोलंदाजांना तोटा सहन करावा लागतो. परिणामी, दुसऱ्या डावात फलंदाजी सोपी होते. या कारणास्तव, नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही संघ फलंदाजी करतो. त्यामुळे त्याची सामना जिंकण्याची शक्यता वाढते.
एक वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, दव पडल्यामुळे फिरकीपटूंना मोठा फटका बसतो. खेळपट्टीवर जास्त गवत असेल तर संघांना फिरकीपटूंवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही. याशिवाय वनडेमध्ये मोठ्या धावसंख्येची गरज नाही. याशिवाय चौकार आणि षटकार सहज मारता न येण्यासाठी सीमारेषा 70 मीटरपेक्षा जास्त असावी, असेही आयसीसीकडून सांगण्यात आले आहे.
आयसीसीला वाटत आहे की, या विश्वचषकात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची रहावी. मात्र, जशी स्पर्धा पुढे जाईल तशी स्पर्धेत पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे आता बीसीसीआय काय भूमिका घेते आणि भारतीय संघाला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार करते की आयसीसीच्या सूचनांचा अवलंब करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(ICC Suggest All Curetors In ODI World Cup For Sporting Pitches)
हेही वाचाच-
सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर