२८ मे ला आयसीसीच्या बोर्ड मिटिंगमध्ये टी२० विश्वचषक २०२०ला २०२२पर्यंत स्थगित करण्याचा विचार केला जाऊ शकतो. १८ ऑक्टोबरपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रलेयामध्ये होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकावर कोरोना व्हायरसचे सावट पसरल्यामुळे या महिन्यांच्या शेवटी होणाऱ्या मिटिंगमध्ये विश्वचषकाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
असा अंदाजा लावला जात आहे की, आयसीसी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष क्रिस टेटली हे टी२० विश्वचषकाबाबत ३ पर्याय मांडू शकतात. आयसीसी बोर्डच्या एका सदस्याने पीटीआयला बोलताना त्या ३ पर्यांयाविषयी सांगितले आहे. ते म्हणाले की, “पहिला पर्याय हा असू शकतो की, टी२० विश्वचषकाचे आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार केले जाईल. असे केल्यास खेळाडूंना १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल आणि प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची अनुमती दिली जाईल.”
“दुसरा पर्याय हा असेल की, टी२० विश्वचषकाचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना केले जाऊ शकते. तर, तिसरा पर्याय हा आहे की, टी२० विश्वचषक २०२० हा २०२२पर्यंत स्थगित केले जाऊ शकते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, पुढील वर्षी म्हणजे २०२१मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बदल्यात भारतात टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.”
आयसीसी बोर्ड सदस्याने हेही सांगितले की, “काही महिन्यांसाठी विश्वचषकाला पुढे ढकलण्याचा विचार केला जाऊ शकत नाही. कारण, फेब्रुवारी-मार्च २०२१मध्ये महिला वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे २ आयसीसी इव्हेंट एकदाच होऊ शकत नाहीत. महिला वनडे विश्वचषकात फक्त ८ संघ सहभागी हणार आहेत. त्यामुळे त्याचे आयोजन करणे अधिक सुरक्षित ठरेल.”
टी२० विश्वचषाव्यतिरिक्त आयसीसीच्या मिटिंगमध्ये नवीन खेळण्याच्या अटींवर फेरविचार केला जाऊ शकतो. शिवाय, अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या दोन महिन्यांच्या मुदतवाढीवरही चर्चा होऊ शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
बंदी घातलेला क्रिकेटपटू म्हणतोय, मला भारताला जिंकून द्यायचाय २०२३चा विश्वचषक
विश्वविजेत्या कर्णधाराने बदलली रखवालदाराच्या मुलाची जिंदगी, आज मोदीही…
ज्या स्टेडियमवर धोनीच्या षटकाराने इंडियाला मिळवुन दिला विश्वचषक ते…