यंदाच्या टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 22वा सामना पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला गेला. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्ताननं यंदाच्या टी20 विश्वचषकातला पहिलाच विजय मिळवला. त्यांनी कॅनडाचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केला.
पाकिस्तानसाठी 107 धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवाननं (Mohammed Rizwan) नाबाद 53 चेंडूत सर्वाधिक 53 धावा ठोकल्या. यादरम्यानं त्यानं 2 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार लगावला. तर कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) 33 धावांच्या उत्कृष्ट खेळीनं पाकिस्ताननं या सामन्यात विजय मिळवला. कॅनडासाठी डिलन हेलिगरनं 4 षटकात सर्वाधिक 2 विकेट घेतले. तर जेरेमी गॉर्डननं 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी पाकिस्ताननं टाॅस जिंकून प्रथम कॅनडाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. त्याबदल्यात कॅनडानं 107 धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवलं होतं. कॅनडासाठी सलामीवीर आरोन जॉन्सननं 44 चेंडूत सर्वाधिक 52 धावांची खेळी खेळली. यादरम्यानं त्यानं 4 चौकारांसह 4 उत्तुंग षटकार ठोकले. तर कलीम सनानं 13 धावा आणि कर्णधार साद बिन जफरच्या 10 धावांच्या खेळीनं कॅनडा संघ 7 विकेट्स गमावून केवळ 106 धावांपर्यंतच पोहचू शकला.
पाकिस्तानसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरनं (Mohammed Amir) 2 विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर हरिस रौफनं (Haris Rauf) 2, शाहीन आफ्रिदी (Shahin Afridi), नसीम शाह (Nasim Shah) यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मोहम्मद अमिरला देण्यात आला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर
कॅनडा- आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा(यष्टीरक्षक), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्ताननं आयसीसीकडे पाठवलं, आगामी चॅम्पियन ट्राॅफीचं संभावित वेळापत्रक!
मोठी बातमी: पराभवानंतर सिक्युरिटी गार्डकडून एका पाकिस्तानी युट्यूबरचा खून…!
पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11