यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 49वा सामना (23 जून) अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला जात आहे. बार्बाडोसच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सुपर 8 ग्रुप-2 मधील ही लढत आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेनं इंग्लंडसमोर 116 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
इंग्लंडनं टाॅस जिंकून अमेरिका संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात अमेरिका संघ 115 धावाच करु शकला. अमेरिकेकडून नितीश कुमारनं (Nitish Kumar) 24 चेंडूत सर्वाधिक 30 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 1 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसननं 29 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 1 षटकार ठोकला. हरमीत सिंग 21, स्टीव्हन टेलर 12, कर्णधार आरोन जोन्स 10 धावा यांच्या जोरावर अमेरिकेनं सर्वबाद 115 धावा केल्या.
इंग्लंडसाठी प्रतिभावान वेगवान गोलंदाज ख्रिस जाॅर्डननं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज सॅम करन आणि फिरकीपटू आदिल रशीदनं प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि रीस टोपले यांनी 1-1 विकेट घेत अमेरिकेला 115 धावांवर रोखले. आता 116 धावांचा पाठलाग करण्यात इंग्लंड यशस्वी होईल की नाही? हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
इंग्लंड- फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले
अमेरिका- स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), नितीश कुमार, आरोन जोन्स (कर्णधार), कोरी अँडरसन, मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावळकर