यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संंघानं चमकदार कामगिरी केली आहे. विजयाची हॅट्रिक लगावून त्यांनी सुपर 8 साठी जागा पक्की केली. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या 3 सामन्यात फ्लाॅप गेला. त्यानं 1, 4, 0 अशी धावसंख्या केली आहे. तत्पूर्वी कोहलीच्या या खराब फाॅर्मवर भारताचा माजी खेळाडू दीप दासगुप्तानं (Deep Dasgupta) मोठं वक्तव्य केलं आहे.
दीप दासगुप्ता स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला की, रोहित शर्माचं उदाहरण पाहा सलीमीला येऊन तो 15 चेंडू खेळून 20-25 धावांची खेळी खेळून जातो, हे खूप महत्वाचं आहे. पुढे बोलताना तो म्हणला, “आपण धावांबद्दल बोलत आहोत आणि ते खूप महत्वाचं आहे. परंतु जर तुम्ही सलामीला येत असाल तर इम्पॅक्ट पाडणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही 30 धावा बनवता, पण त्या 20 चेंडूत येतात. परंतु या धावा 45 चेंडूवर 50 करण्यापेक्षा खूप महत्वाच्या आहेत. त्यासाठी इम्पॅक्ट खूप महत्वाचा आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “या ठिकाणी अशा खेळपट्ट्या आहेत. जिथे तुम्हाला महत्वपूर्ण खेळी करावी लागेल. मागच्या एक-दीड वर्षात तुम्ही रोहितचं उदाहरण घ्या. त्यानं जास्त धावा केल्या नाहीत. परंतु भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. 15 चेंडूत 20-25 धावांची खेळी खराब नाही. जर अर्धशतक, शतक ठोकलं तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानं 15 चेंडूत 25 धावा करुन सुद्धा चांगली कामगिरी केली आहे.”
दीप दासगुप्ता म्हणाला, “विराट कोहलीचा फाॅर्म भारतासाठी चिंतेचा विषय नाही. परंतु तुम्ही धावा केल्या नाहीत, तर तुम्ही खराब खेळाडू बनता. तुम्ही फाॅर्ममधून बाहेर नाही. तुम्ही धावांपासून बाहेर आहे. जो सध्या विराट कोहली आहे. विराटची कारकीर्द बघून मी त्याच्या फाॅर्मविषयी अजिबात चिंतेत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव इतिहास रचण्याच्या जवळ, असं करताच मोडेल धोनी अन् कार्तिकचा विक्रम
मार्कस स्टॉइनिस टी20 अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वल स्थानी, आश्चर्यकारक! टाॅप-5 मध्ये एकही भारतीय नाही
मुथय्या मुरलीधरनचं भारतीयांना गिफ्ट! या ठिकाणी करणार तब्बल 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक