यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना आज (29 जून) रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला जात आहे. भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तर दक्षिण आफ्रिका एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगला आहे. आफ्रिकेसमोर भारतानं या सामन्यात 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
तत्पूर्वी भारतानं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सलामीला आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताला चांगली सुरुवात करुन देऊ शकले नाहीत. रोहित शर्मा केशव महाराच्या चेंडूवर क्लासेनच्या हातात झेलबाद झाला. रोहितनंतर रिषभ पंतला देखील महाराजनं त्याच ओव्हरमध्ये शून्यावर तंबूत पाठवलं.
भारताकडून सलामीवीर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चांगली भागीदारी रचली. कोहलीनं भारतासाठी 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. यादरम्यान त्यानं 6 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर अक्षरनं 31 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं खणखणीत 4 षटकार ठोकले. शिवम दुबेनं 27 धावांची खेळी खेळली आणि भारतानं 7 गडी गमावून 176 धावा ठोकल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी फिरकीपटू केशव महाराज आणि वेगवान गोलंदाज एनरिक नाॅर्टजे यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, मार्को जेन्सन यांनी 1-1 विकेट घेतली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात महत्त्वाच्या सामन्यात ‘हिटमॅन’ फ्लॉप, भारतीय संघाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार का?
केशव महाराजचा भारताला दे धक्का! एकाच षटकात भारताला आणलं बॅकफूटवर
भारत बनणार विश्वविजेता! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी