---Advertisement---

कर्णधार रोहित शर्माचं झंझावाती अर्धशतक! भारताचं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान

On: शुक्रवार, जून 28, 2024 12:08 AM
Rohit Sharma (1)
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 सामना आज (27) जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs England) यांच्यामध्ये खेळला जात आहे. प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना रंगला आहे. रोहितच्या सेननं या मैदानावर इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

इंग्लंडनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 39 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. यादरम्यानं त्यानं 6 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) 47 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 23, रवींद्र जडेजा 17 धावांच्या जोरावर भारतानं 7 गडी गमावून 171 धवा ठोकल्या.

इंग्लंडसाठी ख्रिस जाॅर्डननं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले, सॅम करन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

इंग्लंड- फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले

महत्त्वाच्या बातम्या-

यंदाच्या टी20 विश्वचषकात कोहलीचा आयपीएल फाॅर्म ठरला झीरो!
सेमीफायनल सामन्यात भारतानं हारला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
“जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा…” कपिल देवची भन्नाट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---