यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8चा पहिला सामना आज (19 जून) रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध युनायटेड स्टेट्स अमेरिका (RSA vs USA) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स या स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेची धुरा एडन मार्करमच्या हाती आहे. तर अमेरिका संघाची धुरा आरोन जोन्सच्या हाती आहे. अमेरिकेनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम(कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
अमेरिका- शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावळकर
दक्षिण आफ्रिकेनं यंदाच्या टी20 विश्वचषकात धमाकेदार कामगिरी केली. एकही साखळी सामना न गमावता दक्षिण आफ्रकेनं सुपर 8 मध्ये धडक मारली. आफ्रिकेनं यंदाच्या टी20 विश्वचषकात 4 साखळी सामने खेळले त्यामध्ये त्यांनी श्रीलंका, नेदरलँड, बांग्लादेश, नेपाळ या संघांचा धुव्वा उडवला आणि ग्रुप-ड च्या गुणतालिकेत 8 गुणांसह आफ्रिका शीर्ष स्थानी मजबूत राहिले.
अमेरिका संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या शुभारंभ सामन्यात कॅनडा संघाचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारुन इतिहास रचला. तिसऱ्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा चौथा सामना आयर्लंडविरुद्ध खेळला जाणार होता. परंतु या सामन्यात पावसानं खोळंबा घातला आणि ग्रुप-अ च्या गुणतालिकेत 5 गुणांसह अमेरिकेनं क्वालिफाय केले.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायच झालं तर टी20 आंतरराष्ठ्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ कधीही भिडले नाहीत. यंदाच्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच भिडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मृती मानधनानं रचला इतिहास! 84 सामन्यांतच 7 शतके झळकावून केली मिताली राजची बरोबरी
स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरची शानदार शतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावांचं आव्हान
आजपासून सुपर-8 चा थरार, पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेसमोर अमेरिकेचे तगडे अव्हान!