यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8 मधील तिसरा सामना गुरुवारी (20 जून) रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. तर यंदाच्या टी20 विश्वचषकात राशीद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखाली अफगाणिस्ताननं देखील चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्मानं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
अफगाणिस्तान- रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झादरन, हजरतुल्ला झझई, गुलबदिन नाईब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी
भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या 3 साखळी सामन्यात भारतानं विजयाची हॅट्रिक लगावली. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतानं यंदाच्या टी20 विश्वचषकात आयर्लंड, पाकिस्तान आणि यजमान अमेरिका या संघाचा धुव्वा उडवून सुपर 8 सामन्यांसाठी मुसंडी मारली. भारतासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा उत्कृष्ट फाॅर्ममध्ये आहे.
राशीद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर 8 साठी क्वालिफाय केलं. अफगाणिस्तानं साखळीफेरीच्या 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा वेस्ट इंडिज संघानं धुव्वा उडवला. अफगाणिस्तानसाठी वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी चांगल्याच फाॅर्ममध्ये आहे. त्यानं 4 सामन्यांमध्ये 12 विकेट्स त्याच्या नावी केल्या आहेत.
भारतापुढे या सामन्यात अफगाणिस्तानचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. परंतु दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान संघ भारतापुढे टी20 क्रिकेटमध्ये अद्याप विजय मिळवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
महागडी ऑडी कार आली कुठून? पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचे गंभाीर आरोप!
मोठी बातमी: बीसीसीआयनं जाहीर केलं टी20 विश्वचषकानंतरचं भारतीय संघाचं वेळापत्रक
टीम इंडियासाठी ‘हा’ खेळाडू एक्स फॅक्टर! टी20 विश्वचषकादरम्यान फलंदाजी पाहून रवी शास्त्रीं प्रभावित