यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातला (ICC T20 World Cup) 47वा आज (22 जून) भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये खेळला जात आहे. सुपर 8 मधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा येथे हा सामना रंगला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना भारतानं बांग्लादेशसमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
बांग्लादेशनं टाॅस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं बांग्लादेशसमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघाला शानदार सुरुवात करुन दिली. विराट कोहलीनं (Virat Kohli) 28 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये 3 गगनचुंबी षटकार ठोकले. तर रिषभ पंतनं 24 चेंडूत 36 धावांची आक्रमक खेळी केली. यादरम्यानं 4 चौकांरांसह 2 उत्तुंग षटकार लगावले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) 23, शिवम दुबे (Shivam Dube) 34 धावा, हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) 27 सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 5 उत्तुंग षटकार ठोकले आणि भारतानं 5 गडी गमावून 196 धावांचं आव्हान गाठलं. बांग्लादेशसाठी वेगवान गोलंदाज तन्झिम हसन साकिब आणि फिरकीपटू रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घतले. तर शाकिब अल हसननं 1 विकेट्स घेतली. दिलेल्या आव्हानाचा पाठलाग बांग्लादेश कशाप्रकारे करतं हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
बांग्लादेश- तन्झीद हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), तौहिद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN सामन्यात बांग्लादेशनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
टी20 विश्वचषक सुपर-8 च्या अंतिम टप्यात! जाणून घ्या संपूर्ण संघांची स्थिती, उपांत्य फेरीचे समीकरण
भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी PM मोदींनी दोन्ही संघांना दिल्या शुभेच्छा