आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज बुधवारी (25 सप्टेंबर) खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये यशस्वी जयस्वालला कसोटी फलंदाजांच्या यादीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. यशस्वीने टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. तो 751 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईत बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वीने अर्धशतक (56) झळकावले. तो सध्या भारताचा सर्वोच्च क्रमांकाचा कसोटी फलंदाज आहे. यष्टिरक्षक रिषभ पंतनेही मजल मारली आहे. त्याने पुन्हा टॉप-10 मध्ये पुनरागमन केले आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 39 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात शतक (109) झळकावले होते.
पंतने डिसेंबर 2022 नंतर पुनरागमन करताना शानदार शतक झळकावत आपला फाॅर्म दाखवून दिला. आयसीसी क्रमवारीत आता तो 751 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला नुकसान सोसावे लागले आहे. कोहलीची पाच स्थानांनी घसरण होऊन तो 12व्या स्थानी घसरला आहे. त्याच्याकडे 709 गुण आहेत. पहिल्या कसोटीत त्याने एकूण 23 धावा केल्या होत्या. तर कर्णधार रोहित शर्मीची बॅटही शांत राहिली. रोहितचीही पाच स्थानांनी घसरण झाली आहे. सध्या तो दहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे 716 गुण आहेत. तर जो रूट (899) अव्वल तर केन विल्यमसन (852) दुसऱ्या स्थानावर आहे. डॅरिल मिशेल (760) आणि स्टीव्ह स्मिथ (757) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
Indian batters in ICC Test ranking:
– Yashasvi Jaiswal 5th.
– Rishabh Pant 6th.
– Rohit Sharma 10th.
– Virat Kohli 12th.
– Shubman Gill 14th.5 INDIAN BATTERS IN TOP 20 🤯 pic.twitter.com/XR3hvV7Vok
— Johns. (@CricCrazyJohns) September 25, 2024
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. तो 743 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. जयसूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या गाले कसोटीत नऊ विकेट्स घेतल्या होत्या. जयसूर्या (743) हा श्रीलंकेचा तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोच्च क्रमांकाचा खेळाडू आहे. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (871) कसोटी गोलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर असून जसप्रीत बुमराह (854) दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईकडून अश्विनने 6 आणि बुमराहने 5 विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा-
कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!
कुलदीपला संधी, सिराज ड्रॉप होणार? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
इराणी चषकासाठी संजू सॅमसनकडे पु्न्हा दुर्लक्ष; या कारणांमुळे संघात स्थान नाही?