आयसीसीने कसोटी क्रमवारीत मोठे अपडेट केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार रँकिंगमध्ये मोठे फेरबदल पहायला मिळत आहेत. इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज जो रूटने किवी कर्णधार केन विल्यमसनला मागे टाकत कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याची बॅट चांगली चालली होती. शतक करण्यात तो नक्कीच हुकला, पण त्याने संघासाठी 87 धावांची मौल्यवान खेळी खेळली. त्यामुळे अखेरचा कसोटी सामनाही जिंकण्यात इंग्लिश संघ यशस्वी ठरला.
ताज्या कसोटी क्रमवारीत, जो रूट 872 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. केन विल्यमसनची आता दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याच्या नावावर 859 गुण आहेत. भारतीय संघाचे 3 खेळाडू टाॅप-10 मध्ये आहेत. हे दुसरे कोणी नसून संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली आहेत.
🚨 JOE ROOT BECOMES THE NEW NO.1 RANKED TEST BATTER. 🚨
– Kane Williamson’s reign ends! pic.twitter.com/NUEDarrhtm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 31, 2024
आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 751 रेटिंगसह सहाव्या स्थानी आहे. तर डावखुरा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल 740 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. तर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 737 रेटिंगसह दहाव्या स्थानी आहे.
जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 कसोटी फलंदाज बनण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी 8 वेळा हे पद भूषवले आहे. 2015 मध्ये त्याने प्रथमच अव्वल स्थान मिळवले.
ताजी कसोटी क्रमवारी
872 – जो रूट – इंग्लंड
859 – केन विल्यमसन – न्यूझीलंड
768 – बाबर आझम – पाकिस्तान
768 – डॅरिल मिशेल – न्यूझीलंड
757 – स्टीव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया
751 – रोहित शर्मा – भारत
749 – हॅरी ब्रूक – इंग्लंड
740 – यशस्वी जैस्वाल – भारत
739 – दिमुथ करुणारत्ने – श्रीलंका
737 – विराट कोहली – भारत
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिकमधील या व्हायरल फोटोची जगभरात धूम, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो लाईक्स!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचा दबदबा, पीव्ही सिंधूपाठोपाठ लक्ष्य सेनही विजयी
कोल्हापूरचा पोरगा ऑलिम्पिक फायनलमध्ये! नेमबाज स्वप्नील कुसाळे सुवर्ण पदकाचा वेध घेणार