---Advertisement---

आयसीसी कसोटी क्रमवारीत जडेजाला बसला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूने पटकाविला दुसरा क्रमांक

On: बुधवार, जुलै 15, 2020 6:02 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। रविवारी (१२ जुलै) जेसन होल्डरच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने इंग्लंड विरुद्ध साऊथँम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळविला. त्याचबरोबर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. होल्डरने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत त्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याबरोबरच मागील २० वर्षांमध्ये वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाने मिळविलेले हे सर्वोत्तम स्थान आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९१ धावा देत ७ विकेट्स घेणाऱ्या होल्डरने (Jason Holder) आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वोत्तम ८६२ गुण मिळविले आहे. जे कर्टनी वॉल्शने २००० मध्ये मिळविलेल्या ८६६ गुणांनंतर वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाने मिळविलेले सर्वाधिक गुण आहेत.

आयसीसी कसोटी क्रमवारी

कोरोना व्हायरसमुळे भारतीय संघाने मार्चपासून एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. असे असले तरीही काही भारतीय क्रिकेटपटूंनी फलंदाज आणि गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल १० मध्ये आपले स्थान मिळविले आहे. कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत स्टिव्ह स्मिथनंतर कसोटी क्रमवारीत ८८६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) अनुक्रमे सातव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. याबरोबरच अव्वल १० गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सातव्या क्रमांकावरील एकमेव भारतीय आहे.

होल्डर पहिल्या कसोटी सामन्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत ३५व्या क्रमांकावर आहे तसेच तो अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४८५ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सही कारकिर्दीतील सर्वोत्तम ४३१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

स्टोक्सने एजस बाऊलमध्ये ४३ आणि ४६ धावांची खेळी केल्यानंतर त्याने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये फलंदाजी क्रमवारीत मिळविलेल्या ९व्या क्रमांकाची बरोबरी केली आहे. सामन्यात ६ विकेट्स घेत स्टोक्स गोलंदाजी क्रमवारीत तीन स्थानांच्या मदतीने २३व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

इंग्लंडचा डावखुरा सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्सने पहिल्या डावात ३० आणि दुसऱ्या डावात ४२ धावांची खेळी करत पहिल्यांदाच अव्वल ३० जणांच्या यादीत स्थान मिळविले आहे. तर इंग्लंडचा फलंदाज जॅक क्राऊले सामन्यात ८६ धावा करत अव्वल १०० जणांच्या यादीत सामील झाला आहे.

याव्यतिरिक्त सामन्यात ९ विकेट्स घेत ‘सामनावीर’ पुरस्कार मिळविणाऱ्या वेस्ट इंडिजच्या शॅनन गॅब्रियलला (७२६) १ स्थानाचा फायदा झाला असून तो १८ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याला ४६ गुणांचा फायदा झाल्यामुळे तो भारतीय संघाचा खेळाडू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) (७२२) ४ गुणांनी मागे टाकले आहे. त्यामुळे जडेजा १९ व्या क्रमांकावर घसरला आहे.

दुसऱ्या डावात ९५ धावा करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा जर्मन ब्लॅकवूडला १४ स्थानांचा फायदा झाला असून त्याने ५८ वा क्रमांक मिळविला आहे. याव्यतिरिक्त शेन डावरिचने कारकिर्दीतील सर्वोत्तम ५६२ गुणांसह ३७ व्या क्रमांकावर आहे. डावरिचने पहिल्या डावात ६१ आणि दुसऱ्या डावात २० धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-‘सर’ पदवी मिळालेले ५ दिग्गज क्रिकेटपटू

-असे ५ क्रिकेटपटू ज्यांनी सिद्ध केले वय हा केवळ एक आकडा आहे

-भारताच्या या क्रिकेट अंपायरमुळे गावात आले मोबाइल नेटवर्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---