आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने सोमवारी (७ डिसेंबर) नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. कसोटीतील फलंदाज व गोलंदाजांच्या या क्रमवारीत बरीच उलथापालथ झाली आहे. या नव्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना नुकसान सोसावे लागल्याचे दिसून आले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने फलंदाजांच्या क्रमवारीत वरच्या दिशेने झेप घेतली. भारताच्या चेतेश्वर पुजाराने फलंदाजांच्या क्रमवारीत आपले सातवे स्थान अबाधित ठेवले आहे.
केन विलियम्सनने पटकावले दुसरे स्थान
आज (७ डिसेंबर) आयसीसीने कसोटी फलंदाज व गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज या कसोटी सामन्यात द्विशतक काढणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला क्रमवारीत सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याने चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विलियम्सन दुसऱ्या स्थानी आल्याने तो भारताचा कर्णधार विराट कोहलीशी संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. आता दोघांचेही प्रत्येकी ८८६ गुण झाले आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लॅब्यूशाने व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हे आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह अव्वलस्थान काबीज करून आहे. न्यूझीलंडच्या टॉम लॅथम याने भारताचा उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेला पछाडत अव्वल दहामध्ये जागा पटकावली.
गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह ‘जैसे थे’
गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानी आहे. न्यूझीलंडच्या नील वॅगनरने इंग्लंडच्या दिग्गज स्टुअर्ट ब्रॉडला मागे टाकत, दुसरे स्थान काबीज केले. गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे न्यूझीलंडचा टीम साऊदी आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहेत. सोबतच सहाव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नवव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह एकटाच भारतीय गोलंदाज अव्वल दहामध्ये आहे.
कसोटी फलंदाजांची क्रमवारी
१. ९११ गुण- स्टीव स्मिथ
२. ८८६ गुण*- केन विलियम्सन
८८६ गुण- विराट कोहली
४. ८२७ गुण- मार्नस लॅब्युशेन
५. ७९७ गुण- बाबर आझम
६. ७९३ गुण- डेविड वॉर्नर
७. ७६६ गुण- चेतेश्वर पुजारा
८. ७६० गुण- बेन स्टोक्स
९. ७३८ गुण- जो रूट
१०. ७३३ गुण- टॉम लॅथम
कसोटी गोलंदाजांची क्रमवारी
१. ९०४ गुण- पॅट कमिन्स
२. ८४९ गुण- नील वॅगनर
३. ८४५ गुण- स्टुअर्ट ब्रॉड
४. ८१७ गुण- टीम साऊदी
५. ८०२ गुण- कागिसो रबाडा
६. ७९७ गुण- मिचेल स्टार्क
७. ७८७ गुण- जेसन होल्डर
८. ७८१ गुण- जेम्स एँडरसन
९. ७७९ गुण- जसप्रीत बुमराह
१०. ७६९ गुण- जॉश हेजलवूड
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून विराट सलग सोडतोय झेल; माजी भारतीय फलंदाजाने सांगितले कारण
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग