---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिनचे चूकीचे नाव घेतल्याने आयसीसीनेही केले ट्रम्प यांना ट्रोल

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2020 1:48 PM
---Advertisement---

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प काल दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये तयार झालेल्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ‘मोटेरा स्टेडियम’वर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात भारताचे दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांची नावे देखील घेतली. मात्र या दरम्यान सचिनचे नाव घेताना त्यांच्याकडून चूक झाली. त्यांनी सचिन ऐवजी सुचिन असे नाव घेतले. त्यामुळे ट्रम्प यांना सध्या ट्रोल करण्यात येत आहे.

https://twitter.com/LoyalSachinFan/status/1231865089436852224

यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही(आयसीसी) सोशल मीडियावर ट्रम्प यांना सचिनचे चूकीचे नाव घेतल्याने ट्रोल केले आहे. आयसीसीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये गूगलचे सर्च इंजिन दाखवण्यात आले आहे. ज्यात सचिनचे नाव सुचिन लिहिले आहे आणि हेच नाव सेव्ह केले आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ICC/status/1231889429247275009

https://twitter.com/Maha_Sports/status/1232205971621060609

https://twitter.com/Maha_Sports/status/1232183742195806208

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---