---Advertisement---

‘आज रात्री, दुबईत…’, आयसीसीकडून भारत वि. पाकिस्तान सामन्याचा प्रोमो शेअर, व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 2:33 PM
---Advertisement---

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (२४ ऑक्टोबर) संध्याकाळी ७.३० वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक २०२१ चा १६ वा सामना रंगणार आहे. कट्टर प्रतिद्वंद्वी असलेल्या या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थातच आयसीसीसुद्धा या लढतीसाठी उत्सुक आहे. आयसीसीने या सामन्याच्या काही तासांपूर्वी उभय संघातील जुन्या क्षणचित्रांनी भरलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आजवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी२० विश्वचषक सामन्यांतील काही क्षण दाखवण्यात आले आहेत. ५८ सेकंदांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करत आयसीसीने आकर्षक असा कॅप्शन दिला आहे. ‘संपूर्ण जग आज होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहतो आहे. आज रात्री दुबईमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत,’ असे त्यांनी लिहिले आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे चाहत्यांच्या भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. याबरोबरच अनेकांच्या मनात जोश भरला गेला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तर, ‘आम्ही दोन्ही आशियाचेच देश आहोत, मग आम्ही आपापसांमध्ये का भिडायचे?’, असा प्रश्न आयसीसीला विचारला आहे.

भारत वि. पाकिस्तान आमने सामने कामगिरी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण आठ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. यात भारतीय संघाने ६ सामने जिंकले आहेत, पाकिस्तानला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात १३२ वेळा आमने-सामने आले आहेत. पाकिस्तानच्या नावावर ७३ तर भारताच्या नावावर ५५ एकदिवसीय सामन्यात विजयाची नोंद आहे. यातील ४ सामने रद्द झाले आहेत. याशिवाय, दोन्ही संघ ५९ कसोटीत सामन्यात लढले आहेत, ज्यात भारताने ९ सामने जिंकले आहेत तर पाकिस्तान संघाने १२ वेळा विजय नोंदवला आहे. यातील ३८ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-पाकिस्तान संघातील ३ क्रिकेटर, ज्यांनी अनुभवलाय २००७ टी२० विश्वचषक फायनलचा थरार

प्रतीक्षा संपली! आज रंगणार भारत-पाकिस्तानचा महासंग्राम; वेळ, ठिकाण आणि लाईव्ह स्ट्रिमिंग वाचा संपूर्ण माहिती

लेकापेक्षा देश मोठा! ईशानचे कुटुंबीय म्हणाले, ‘मुलाला पाकिस्तानविरुद्ध संधी मिळो न मिळो, पण भारत जिंकावा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---