आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी (२४ ऑक्टोबर) होणाऱ्या या सामन्यावर बिहार वासियांचे देखील लक्ष असणार आहे. याचे सर्वात मोठे कारण ईशान किशन आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या ईशान किशनची आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या यशामुळे त्याचे समर्थक आणि आई चित्रा देखील खूप खुश झाल्या आहेत.
भारत- पाकिस्तान सामन्यासाठी आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबाबत त्याची आई चित्रा म्हणाल्या की, “लहानपणी जेव्हा तो क्रिकेट खेळायचा आणि टीव्हीवर क्रिकेट सामना पाहायचा, त्यावेळी त्याचे देखील स्वप्नं होते की, त्याने भारतीय संघासाठी खेळावं. परंतु त्याचा उत्साह तेव्हा वाढायचा जेव्हा विश्वचषक स्पर्धा आणि भारतीय संघाचा सामना असायचा. जेव्हा त्याची निवड टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली. त्यावेळी आमची काय हालत झाली होती, याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. हे एका स्वप्नसारखे आहे. आता आमचे लक्ष भारत- पाकिस्तान सामन्यावर आहे. या सामन्यात ईशान किशनला खेळायची संधी मिळो अथवा ना मिळो, भारतीय संघ पाकिस्तान संघाला पराभूत करणार.”
तसेच त्याचे वडील प्रणव म्हणाले की, “मुलाच्या खेळण्यामुळे मी उत्साहित आहे. परंतु भारत- पाकिस्तान सामन्यासाठी मी अती त्साहित आहे. जर ईशानला भारतीय संघात स्थान मिळाले तर तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. परंतु संधी नाही मिळाली तरी काहीच हरकत नाही. कारण भारतीय संघात स्थान मिळवणे हीच एक मोठी गोष्ट आहे. आम्ही गेले अनेक वर्ष विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहतोय. परंतु आमचा मुलगा विश्वचषक खेळणार हे एका स्वप्नासारखे आहे.”
ईशान किशनला घडवण्यात त्याच्या वहिनी, डॉक्टर पल्लवीने देखील मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी म्हटले की, “ईशानला भारतीय संघात स्थान मिळणे हे विश्वचषक स्पर्धा खेळण्यासारखे आहे. जर त्याला पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संधी मिळाली तर, तो पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगला चोप देऊ शकतो. त्याला पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संधी नाही मिळाली तरी चालेल. पण भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारलीच पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यासाठी कशी असणार दुबईची खेळपट्टी आणि हवामान? जाणून घ्या सविस्तर
पाकिस्तानी महिला चाहलीचा राहुल-धोनीकडे सामना हरण्याचा हट्ट, मेंटॉरच्या उत्तराने केली बोलती बंद
महामुकाबल्याआधी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘या’ ३ क्रमांकावरील खेळाडू अद्यापही अनिश्चित





