---Advertisement---

महामुकाबल्याआधी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘या’ ३ क्रमांकावरील खेळाडू अद्यापही अनिश्चित

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 11:12 AM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील सुपर-१२ सामने असून रविवारी (२४ ऑक्टोबर) या स्पर्धेत क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या हाय व्होल्टेज सामन्याची गेली कित्येक महिने आतुरतेने वाट पाहिली जात होती. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत वाढ होताना दिसून येत आहे.

या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने सर्व खेळाडूंना संधी दिली. मुख्य बाब म्हणजे संघातील सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कुठल्या खेळाडूला कुठल्या क्रमांकावर संधी द्यायची, हा प्रश्न विराट कोहलीला नक्कीच पडला असणार. कदचित हेच कारण असावे की, भारतीय कर्णधार विराट कोहलीने शनिवारी (२३ ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला नाही.

कोण खेळणार चौथ्या क्रमांकावर? 
फलंदाजी फळीतील पहिले ३ क्रमांक जवळपास निश्चित आहेत. परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोन्ही फलंदाजांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. परंतु या सामन्यात ईशान किशनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. याचे कारण असे की, त्याने गेल्या ३ डावात ५०*, ८४ आणि ७०* धावांची खेळी केली आहे.

तर सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्स संघासाठी शेवटच्या सामन्यात ८४ धावांची खेळी केली होती. हे पाहून अनेकांना वाटले की, तो फॉर्ममध्ये परतला आहे. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात तो अवघ्या ८ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. परंतु हाय व्होल्टेज सामन्यात दबाव भरपूर असेल, जे सहन करण्याची क्षमता सूर्यकुमार यादवमध्ये आहे. कारण तो एक समजदार फलंदाज आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.

सातव्या क्रमांकावर कोणाला मिळेल संधी?
सातव्या क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर हे दोघेही प्रबळ दावेदार आहेत. परंतु स्थान कोणाला दिले जाणार हे खेळपट्टीवर अवलंबून असणार आहे. हार्दिक पंड्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाज म्हणून खेळणार आहे. परंतु जर भारतीय संघात अतिरिक्त गोलंदाजाची आवश्यकता असल्यास शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. तरीही कर्णधार विराट कोहली हार्दिक पंड्याला संघात स्थान देऊ शकतो, कारण तो एक उत्तम फिनिशर आहे.

फिरकी गोलंदाज म्हणून कोणाला मिळणार संधी?
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात आर अश्विन आणि वरूण चक्रवर्ती हे दोन फिरकी गोलंदाज देखील आहेत. आर अश्विनने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती. तर वरूण चक्रवर्तीने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, विराट कोहली पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठल्या खेळाडूंना संधी देतो.

महत्त्वाच्या बातम्या-

वेस्ट इंडिज वि. इंग्लंड सामन्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू का बसले गुडघ्यावर? कारण अभिमानास्पद

वन अँड ओन्ली बॉस…! मातब्बर फलंदाज गेलची क्षेत्ररक्षणात खास ‘सेंचूरी’, इंग्लंडविरुद्ध केला पराक्रम

आज श्रीलंकेचा संघ बांगलादेशवर पडणार भारी!! असं आम्ही नाही आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतोय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---