भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की, चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येत असतात. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात रंगणार आहे. रविवार रोजी (२४ ऑक्टोबर) दुबई येथे रंगणाऱ्या या सामन्यांची सर्वांना उत्कंठा लागून आहे. अगदी भारतीय चाहत्यांप्रमाणेच पाकिस्तानचे चाहतेही आपल्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान एका महिला चाहतीने प्रत्यक्षात भारतीय खेळाडूंकडे हा महत्त्वपूर्ण सामना हारण्याची विनंती करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तर झाले असे की, शनिवारी भारतीय खेळाडू सराव सत्र संपवून संघाच्या हॉटेलकडे परत जात होते. यावेळी तिथे उपस्थित एका पाकिस्तानी महिला पत्रकारने भारतीय सलामीवीर केएल राहुल आणि मार्गदर्शक एमएस धोनीकडे हा सामना न गमावण्याची विनंती केली. यावर धोनीनेही तिला मजेशीर उत्तर दिले, जे ऐकून ती निरुत्तर झाली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्हिडिओत दिसते की, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, एमएस धोनी असे बरेचसे भारतीय क्रिकेटपटू सरावानंतर हॉटेलकडे परत जात होते. यावेळी ती पाकिस्तानी महिला पत्रकार सुरुवातीला केएल राहुलला म्हणते की, “राहुल कृपया उद्या चांगला खेळू नकोस.” ती पुन्हा पुन्हा आपले हेच वाक्य म्हणताना दिसते. यावर राहुल हसून तिला प्रतिक्रिया देतो.
https://twitter.com/sawerapasha/status/1451964271571656707?s=20
यानंतर धोनी, बुमराहसंगे जात असताना ती महिला पत्रकार पुन्हा एकदा विनंती करुन पाहाते. यावेळी ती धोनीला म्हणते की, “कृपा करुन हा सामना सोडून द्या. पुढील सामन्यात पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरा. पण या सामन्यात नको.” यावर धोनी हसत तिला उत्तर देतो की, “हेच तर आमचे काम आहे.” अर्थात तो पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ पूर्ण जोर लावून खेळेल, असे अप्रत्यक्षपणे त्या महिला पत्रकारच्या रुपातील पाकिस्तानी चाहतीला उद्देशून सांगतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हे फक्त भारतातच होऊ शकतं! पाकिस्तानचा फडशा पाडण्यासाठी वारासणीत ५०१ दिव्यांची ‘गंगा आरती’
महामुकाबल्याआधी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘या’ ३ क्रमांकावरील खेळाडू अद्यापही अनिश्चित
आज श्रीलंकेचा संघ बांगलादेशवर पडणार भारी!! असं आम्ही नाही आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतोय






