क्रिकेटला भारतात धर्म मानले जाते. या खेळाशी कोट्यावधी भारतीयांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे भारतीय चाहते या खेळावर भरपूर प्रेम करतात. तर भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी हे चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. याचे ताजे उदाहरण वाराणसीमध्ये पाहायला मिळाले आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा विजय व्हावा. तसेच भारतीय संघाने या स्पर्धेत जेतेपद मिळवावे म्हणून बनारस स्थित वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर ५०१ दीप प्रज्वलित करण्यात आले. हे दीप प्रज्वलन करून भाविकांनी भारतीय संघाच्या विजयाची प्रार्थना केली आहे.
गंगा आरतीच्या वेळी उपस्थित स्थानिक लोकांनी सांगितले की, “देशवासीयांच्या मनात एकच इच्छा आहे की, भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून हा सामना जिंकावा. यासाठी आज वाराणसीमध्ये भारतीय संघासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.”
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमी हाय व्होल्टेज सामना असतो. हा सामना भारतीय संघानेच जिंकावा यासाठी कोट्यवधी चाहते प्रार्थना करत असतात. या आरतीसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक भाविकाची देखील हीच इच्छा होती की, भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत करून चोख प्रत्युत्तर द्यावे. गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्रा म्हणाले की, “आजच्या गंगा आरतीला विशेष स्वरूप देण्यात आले होते. भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी विशेष पोस्टर्स लावण्यात आले होते. तर विशेष पूजाही करण्यात आली होती.”
वाराणसी की गंगा आरती में कल होने वाले पहले भारत-पाक T 20 मैच के लिए दीप मालाओं के जरिए की गई प्रार्थना#INDvPAK #Varanasi #ganga_aarti@inextlive @umangmisra pic.twitter.com/9sW2KagGdU
— Anchal Agrawal (@clickanchal) October 23, 2021
https://twitter.com/Mayank1921/status/1452147327536271360?s=20
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.
महत्त्वाच्या बातम्या-
महामुकाबल्याआधी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘या’ ३ क्रमांकावरील खेळाडू अद्यापही अनिश्चित
आज श्रीलंकेचा संघ बांगलादेशवर पडणार भारी!! असं आम्ही नाही आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतोय
वन अँड ओन्ली बॉस…! मातब्बर फलंदाज गेलची क्षेत्ररक्षणात खास ‘सेंचूरी’, इंग्लंडविरुद्ध केला पराक्रम






