रविवारी टी२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. संध्याकाळी ७.३० वाजता भारतीय संघ पाकिस्तानशी मुकाबला करेल. इतिहास, आकडेवारी आणि अलीकडचा फॉर्म भारताच्या बाजूने आहे. मात्र, टी२० च्या प्रकारांमध्ये पाकिस्तानचा संघही उलटफेर करू शकतो. टी२० विश्वचषकात भारताने आतापर्यंत पाकिस्तानला ५ वेळा हरवले आहे. भारतीय संघ ही आघाडी ६-० करू इच्छित आहे. तत्पूर्वी, या सामन्यासाठी हवामान कसे राहील याबाबत आपण जाणून घेऊया.
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
दुबईमध्ये आज संध्याकाळी हवामान स्वच्छ असेल आणि पावसाची शक्यता नाही. संध्याकाळी, तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस राहील, तर वारा दक्षिणेकडून पूर्वेकडे ताशी ७ किमी वेगाने वाहेल. याशिवाय संध्याकाळची आर्द्रता जवळपास ७० टक्के असेल. याचाच अर्थ क्रिकेटसाठी पोषक वातावरण दुबई येथे असेल.
नाणेफेकीवर बरेच काही अवलंबून
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हाय व्होल्टेज सामन्यात नाणेफेक एक अतिशय महत्वाची भूमिका पार पाडेल. युएईमध्ये सध्या हवामान थोडे बदलत आहे. उष्णता कमी होत असून, संध्याकाळी दवांचा परिणाम सामन्यावरही होऊ शकतो. सन २०२० मध्ये आयपीएलच्या पहिल्या भागात उष्णता अधिक होती. त्यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना संघांनी ७७ टक्के सामने जिंकले होते. परंतु, उत्तरार्धात ७७ टक्के सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणार्या संघानी सामने जिंकलेले. या सामन्यात विराट कोहली आणि बाबर आझम हे कर्णधार काय निर्णय घेतात हे पाहणे रंजक असेल.
कसे असेल खेळपट्टीचे स्वरूप
भारताला दुबईत साखळी फेरीतील ५ पैकी ४ सामने खेळायचे आहेत. गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितली तर खेळपट्टीचे स्वरूप इथे फारसे बदललेले नाही. गेल्या दोन आयपीएल दरम्यान, येथे सरासरी धावसंख्या १५०-१६० दरम्यान राहिली आहे. वेगवान गोलंदाजांना अधिक बळी मिळाले आहेत. वेगवान गोलंदाज येथे प्रत्येक बळीसाठी २७ धावा खर्च करतात, तर फिरकीपटू एका बळीसाठी 32 धावांची सरासरी देतात. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तानचे संघ येथे ३-३ वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
हे फक्त भारतातच होऊ शकतं! पाकिस्तानचा फडशा पाडण्यासाठी वारासणीत ५०१ दिव्यांची गंगा आरती
आज श्रीलंकेचा संघ बांगलादेशवर पडणार भारी!! असं आम्ही नाही आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतोय
वन अँड ओन्ली बॉस…! मातब्बर फलंदाज गेलची क्षेत्ररक्षणात खास ‘सेंचूरी’, इंग्लंडविरुद्ध केला पराक्रम






