fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवा टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानचा हा फलंदाज झाला विचित्र पद्धतीने धावबाद, पहा व्हिडिओ

February 4, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात आज(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटपटू कासिम अक्रम विचित्र पद्धतीने धावबाद झाला.

ही घटना सामन्यातील 31 व्या षटकात घडली. या षटकात भारताकडून रवी बिश्नोई गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने टाकलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अक्रमने फ्रंट कव्हरच्या दिशेने फटका मारला आणि तो एकेरी धाव घेण्यासाठी धावला. यावेळी नॉन-स्ट्रायकर एन्डला असलेला पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नाझीरही अर्ध्यापर्यंत पळत आला.

मात्र याचदरम्यान रोहेल आणि अक्रममध्ये धाव घेण्यासाठी गोंधळ झाल्याने रोहेल पुन्हा मागे फिरला तर अक्रमही रोहेलच्या बरोबर नॉन-स्ट्रायकर एन्डला धावला. त्यामुळे दोघेही फलंदाज एकाच बाजूला धावत असल्याचे पाहून अथर्व अंकोलेकरने अडवलेला चेंडू लगेचच यष्टीरक्षक ध्रुवचंद जुरेलकडे फेकला. जुरेलने स्टंम्पवरील बेल्स उडवल्या.

मात्र पाकिस्तानचा कोणता फलंदाज धावबाद झाला आहे हे समजले नसल्याने व्हिडिओ-रिप्ले पहाण्यात आला. यामध्ये दिसले की रोहेल अक्रमच्या आधी नॉन-स्ट्रायकर एन्डला क्रिजमध्ये पोहचला आहे. त्यामुळे अक्रमला मैदानातून परतावे लागेल.

A moment neither Rohail Nazir or Qasim Akram will want to see again.

You can find all the videos from #INDvPAK on our website 👇 #U19CWC | #INDvPAK | #FutureStarshttps://t.co/Q8XLxdz3Ja

— Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020

https://twitter.com/waniarshi/status/1224674929548775425

https://twitter.com/chris_virat/status/1224654011262881792

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 43.1 षटकात सर्वबाद 172 धावा केल्या आणि भारताला 173 धावांचे आव्हान दिले आहे.

पाकिस्तानकडून हैदर अली आणि रोहेलने अर्धशतकी खेळी केल्या. अलीने  77 चेंडूत 9 चौकारांसह 56 धावांची खेळी केली, तर रोहेलने 102 चेंडूत 6 चौकारांसह 62 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद हॅरिसने 21 धावांची छोटेखानी खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

भारताकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. तसेच अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

१९ वर्षांखालील विश्वचषक: टीम इंडियाचे गोलंदाज चमकले; पाकिस्तान संघ झाला ऑलआऊट
वाचा👉https://t.co/bCKhxR53T9👈#U19CWC #INDvPAK #म #मराठी #Cricket #TeamIndia

— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020

पाकिस्तानी फलंदाजाला बाउंसर लागल्यानंतर भारतीय गोलंदाजाने केले असे काही की सर्वत्र झाले कौतुक
वाचा👉https://t.co/XRglwGOfyF👈#U19CWC #INDvPAK #म #मराठी #Cricket #TeamIndia

— Maha Sports (@Maha_Sports) February 4, 2020


Previous Post

४६ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार

Next Post

जयस्वालचे शानदार शतक; पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan and iplt20.com
IPL

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Next Post

जयस्वालचे शानदार शतक; पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये

तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत सेड्रिक-मार्सेल स्टीब, यूची सुगीता यांची आगेकुच

प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सचा चेन्नई सुपरस्टार्जवर 4-3 असा विजय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.