Under 19 World Cup 2024: आजपासून दक्षिण आफ्रिकेत आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक सुरु होत आहे. पहिला सामना अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. तर यजमान दक्षिण आफ्रिकेचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघही सहभागी होत असून त्यांचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक 2024 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. या 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. (icc u19 world cup matches schedule teams groups fixtures time table where to watch)
अ गट – भारत, बांगलादेश, आयर्लंड आणि अमेरिका
ब गट – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड
क गट – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया
ड गट – अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ
19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचे सामने कधी आणि कोणासोबत होणार?
भारतीय संघ स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करेल. हा सामना 20 जानेवारीला होणार आहे. संघाचा दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडशी होणार आहे. 28 जानेवारीला संघ तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना सुपर-6 मध्ये होऊ शकतो.
19 वर्षांखालील विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लीग टप्प्यात दिसणार नाही. हा सामना चाहत्यांना सुपर-6 सामन्यांदरम्यान पाहयला मिळू शकतो.
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 चे स्वरूप
यावेळी सर्व संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर-6 साठी पात्र ठरतील. त्यानंतर या 12 संघांची प्रत्येकी 6 च्या दोन गटात विभागणी केली जाईल आणि दोन्ही गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
भारताने मागच्या वेळी 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता
भारतीय संघ या स्पर्धेची गतविजेती आहे. संघाने यश धुलच्या नेतृत्वाखाली 2022 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ देखील आहे. भारताने ही ट्रॉफी पाच वेळा जिंकली आहे.
भारतात 19 वर्षांखालील विश्वचषकाचे प्रसारण कुठे आणि कसे पहावे?
भारतात 19 वर्षांखालील विश्वचषकाचे सामने स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित केले जातील. जर तुम्हाला मोबाईलवर पाहायचे असेल तर तुम्ही हॉटस्टारवर सामन्यांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय जगभरातील आयसीसी टीव्हीवरही सामने दाखवले जाणार आहेत. दुपारी दीड वाजता सामने सुरू होतील. (ICC U19 World Cup Tournament When and where will the groups, schedule and matches be broadcast live)
हेही वाचा
मोठी बातमी; वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये भूकंप, चार खेळाडूंनी एकाच वेळी जाहीर केली निवृत्ती
IND vs AFG: रोहित-नबी वादावर आर अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘आम्ही तिथे असतो तर…’