---Advertisement---

कोरोना पुढे आयसीसीही हतबल, केल्या २ महत्त्वाच्या विश्वचषकाच्या स्पर्धा रद्द

On: बुधवार, मे 13, 2020 10:08 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने कोविड-१९ मुळे २०२१ महिला विश्वचषक आणि २०२२ मधील १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषकाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या क्वालिफायर स्पर्धा स्थगित केल्या आहेत.

महिला क्वालिफायर स्पर्धा श्रीलंकेमध्ये ३ ते ११ जुलैपर्यंत होणार होती. यामध्ये यजमान श्रीलंका संघसोबत १० संघ भाग घेणार होते. उर्वरित संघांमध्ये बांगलादेश, आयर्लंड, नेदरलँड, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, थायलंड, अमेरिका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

आयसीसीने सांगितले की, सदस्य, संबंधित सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी सल्ला- मसलत केल्यानंतर आयसीसीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.  आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ च्या क्वालिफायर स्पर्धा २४ ते ३० जुलै दरम्यान डेन्मार्कमध्ये होणाऱ्या युरोपीय विभागातील क्वालिफायरबरोबर होणार होती. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आयसीसी प्रतिस्पर्धी देशांबरोबर सल्ला मसलत करणार आहे.”

आयसीसीचे स्पर्धा प्रमुख ख्रिस टेटली यांनी म्हटले की, “खेळाडूंचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. या कठीण काळात आमची प्राथमिकता ही आहे की, खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी, चाहते आणि संपूर्ण क्रिकेट समुदाय निरोगी राहिले पाहिजेत.”

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक क्षेत्रीय क्वालिफायर विभाग २च्या स्पर्धांबद्दलही विचार करत आहे. आफ्रिका क्वालिफायर ७ ते १४ ऑगस्ट दरम्यान टांझानिया तर आशिया क्वालिफायर १ ते ९ डिसेंबरदरम्यान थायलंडमध्ये होणार आहे. सर्व ५ क्षेत्रातील विभाग १च्या स्पर्धा २०२१मध्ये होतील.

ट्रेंडिंग घडामोडी-

-मुंबई इंडियन्समधून लसिथ मलिंगा बाहेर, रोहितलाही वाटले वाईट

-म्हणून तब्बल १ वर्ष सचिन समोर जेवण करत नव्हता हा भारतीय क्रिकेटपटू

-आता जर टीम इंडिया मागे हटली तर कसोटी क्रिकेट संपून जाईल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---