नुकतीच भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय महिला संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघाची कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज हिने आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये पहिले स्थान गाठले होते. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये तिचे नुकसान झाले आहे.(Icc women odi ranking Stephanie Taylor became number one Batsman while mithali raj came on second place)
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीमध्ये मितालीची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर वेस्ट इंडिजची फलंदाज स्टेफनी टेलरने या यादीत पहिले स्थान गाठले आहे. स्टेफनी टेलरने पाकिस्तान संघाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली होती. याच कारणास्तव तिला या यादीत पहिले स्थान मिळण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर, तिने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील अव्वल स्थान गाठले आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तिने नाबाद १०५ धावांची खेळी केली होती. तसेच २९ धावा खर्च करत ३ गडी देखील बाद केले होते. या कामगिरीमुळे तिला ३ गुणांचा फायदा झाला आहे. तिने फलंदाजांच्या यादीत ४ फलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. तसेच गोलंदाजांच्या यादीत ती १६ व्या स्थानी पोहोचली आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताची अनुभवी झुलन गोस्वामी पाचव्या तर दीप्ती शर्मा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
🔝 Batter
🔝 All-rounder@windiescricket star Stafanie Taylor sizzles in the latest @MRFWorldwide ICC Women's ODI Rankings 🔥 pic.twitter.com/OlcuWfEuvV— ICC (@ICC) July 13, 2021
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये इंग्लंडची फलंदाज नेट स्किवर ९ व्या स्थानी पोहोचली आहे.तिने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ५५ धावांची तुफानी खेळी केली होती. तर दीप्ती शर्मा ही ३७ व्या क्रमांकावर पोहोचली आहे.तसेच गोलंदाजांच्या यादीत पुनम यादव सातव्या, शिखा पांडे २७ व्या स्थानावर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका मालिकेसाठी ‘हे’ पाच पंच करणार पंचगिरी, कुमार धर्मसेना यांचाही समावेश
अगग! चेंडू गरकन् फिरला अन् फलंदाजाला कळायच्या आत बत्त्या गुल; अनेकांना झाली वॉर्नची आठवण