---Advertisement---

टीम इंडियाचा टी२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये या संघाविरुद्ध होणार सामना

---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी20 महिला विश्वचषकातील आज होणारे साखळी फेरीतील शेवटचे सामने पावसामुळे रद्द झाले. आज पाकिस्तान महिला संघ विरुद्ध थायलंड महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात सामने होणार होते. यातील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते.

कारण ब गटातून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील स्थान आधीच पक्के केले असले तरी या सामन्यानंतर ब गटातील गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील कोणता संघ अव्वल क्रमांकावर राहणार आणि कोणता संघ दुसऱ्या क्रमांकावर राहणार हे निश्चित होणार होते.

या सामन्याआधी इंग्लंड आणि क्षिण आफ्रिका प्रत्येकी 6 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. पण आजचा दक्षिण आफ्रिकेचा सामना रद्द झाल्याने त्यांना वेस्ट इंडिजबरोबर विभागुन 1 गुण मिळाला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत 7 गुणांसह अव्वल क्रमांकावर आली आहे. तर इंग्लंड 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

त्याचबरोबर अ गटातून भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. साखळी फेरीतील सामन्यांनंतर अ गटातील गुणतालिकेत भारत 4 विजयांसह अव्वल क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलिया 3 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यामुळे आता 5 मार्चला सिडनीत होणारे उपांत्यफेरीतील सामने निश्चित झाले आहेत. पहिला उपांत्य सामना अ गटातील अव्वल क्रमांकाचा संघ भारत विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ इंग्लंड यांच्यात होईल. तर दुसरा उपांत्य सामना ब गटातील अव्वल क्रमांकाचा संघ दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणारा पहिला उपांत्य सामना 5 मार्चला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु होईल. हा सामना संपल्यानंतर लगेचच दुपारी 1.30 वाजता सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा उपांत्य सामना पार पडेल.

या दोन्ही उपांत्य सामन्यात विजयी होणारे संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील. अंतिम सामना  8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार आहे.

असे होणार आहेत उपांत्य फेरीतील सामने – 

5 मार्च – पहिला सामना – भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला, सिडनी (वेळ – सकाळी 9.30 वाजता)

5 मार्च – दुसरा सामना – दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, सिडनी (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

अंतिम सामना –

8 मार्च – उपांत्य सामना 1 मधील विजेता विरुद्ध उपांत्य सामना 2 मधील विजेता, मेलबर्न (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

महत्त्वाच्या बातम्या-

या तीन मोठ्या खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन

जेव्हा ट्रेंट बोल्ट चक्क कांद्यावर करतो स्वाक्षरी, पहा व्हिडिओ

विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---